अमरावती - विधानसभा निवडणुकीसाठी अमरावती जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदार संघासाठी भाजपने मंगळवारी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. भाजपचे प्रवक्ते आमदार गिरिष व्यास यांनी या मुलाखती घेतल्या.
हेही वाचा - तयारी विधानसभेची : उत्तर पुणे जिल्ह्यात भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखती
अमरावती, बडनेरा, तिवसा आणि धामणगाव रेल्वे मतदार संघासाठी मुलाखती झाल्या. तर दर्यापूर, मेळघाट, अचलपूर आणि मोर्शीसाठी शासकीय विश्राम भवन येथे मुलाखत प्रक्रिया सुरू आहे. अमरावती विधानसभा मतदारसंघासाठी आमदार डॉ. सुनील देशमुख, माजी महापौर किरण महल्ले, नगरसेवक सुरेखा लुंगारे यांच्यासह एकूण 12 जणांनी मुलाखती दिल्या.
हेही वाचा - तयारी विधानसभेची ! अकोल्यामध्ये काँग्रेसच्या इच्छुकांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
बडनेरा मतदारसंघात पक्षाचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी, शहर अध्यक्ष जयंत डेहणकार नगरसेवक तुषार भारतीय, प्रदेश कार्यकारिणी सदस्य किरण पातूरकर यांनी मुलाखत दिली. तर तिवसा मतदारसंघासाठी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. दिनेश सूर्यवंशी यांच्यासह 18 जणांनी उमेदवारी मागितली आहे.
हेही वाचा - वर्ध्यात काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती
मेळघाट मतदारसंघासाठी विद्यमान आमदार प्रभूदास भिलावेकर, रमेश मावस्कर यांनी उमेदवारी मागितली आहे. अचलपूर मतदार संघासाठी गजानन कोल्हे, अशोक बनसोड, प्रमोद कोरडे, अक्षरा लहान यांनी मुलाखत दिली. तर दर्यापूर मतदारसंघासाठी आमदार रमेश बुंदेले यांच्यासह विजय विल्हेकाई, डॉ. राजीव जामठे यांनी मुलाखत दिली.