ETV Bharat / state

Gopal Tirmare : जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी आमदार राणा यांच्यासोबतचा वाद विकोपाला नेण्याचा बच्चू कडूंचा प्रयत्न - गोपाल तिरमारे - गोपाल तिरमारेंची बच्चू कडूंवर टीका

आमदार बच्चू कडू यांना बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यासोबतचा वाद (MLA Bachchu Kadu and MLA Rana dispute) विकोपाला न्यायचा आहे. हे त्यांचे नवे नाटक असल्याचा आरोप बच्चू कडू यांचे कट्टर विरोधक आणि चांदूरबाजार तालुक्याचे भाजपचे सरचिटणीस गोपाल तिरमारे यांनी केला (Gopal Tirmare criticizes MLA Bachchu Kadu) आहे.

MLA Bachchu Kadu over MLA Rana dispute
आमदार बच्चू कडू व आमदार रवी राणा वाद
author img

By

Published : Oct 28, 2022, 12:16 PM IST

अमरावती : अचलपूर मतदार संघाचे आमदार आणि माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांना बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यासोबतचा वाद (MLA Bachchu Kadu and MLA Rana dispute) विकोपाला न्यायचा आहे. हे त्यांचे नवे नाटक असल्याचा आरोप बच्चू कडू यांचे कट्टर विरोधक आणि चांदूरबाजार तालुक्याचे भाजपचे सरचिटणीस गोपाल तिरमारे यांनी केला (Gopal Tirmare criticizes MLA Bachchu Kadu) आहे.

प्रतिक्रिया देताना भाजपचे सरचिटणीस गोपाल तिरमारे

मतदार संघातील प्रश्न सोडविण्यास अपयशी : बच्चू कडू हे मतदार संघातील शेतकरी शेतमजूर आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यास पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. त्यांच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतोष निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य जनता शेतकरी आणि शेतमजुरांचे लक्ष विचलित करण्यासाठी आमदार रवी राणा यांच्यासोबतचा वाद विकोपाला नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अचलपुर तालुका तसेच चांदूरबाजार तालुक्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपासून शेतकरी मोठ्या संख्येत वंचित राहिले आहेत. हे बच्चू कडू यांचे अपयश असून याचा परिणाम त्यांच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत असल्याचे गोपाल तिरमारे यांनी म्हटले (Gopal Tirmare criticizes) आहे.

शिंदे सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न : बच्चू कडू यांची शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली नाही. आपल्याला मंत्रिपद मिळावे, यासाठी बच्चू कडू (MLA Bachchu Kadu) हे आमदार रवी राणा यांच्याशी वाद वाढवून सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप देखील गोपाल तिरमारे यांनी केला आहे.

बच्चूकडून सोबत एकही आमदार नाही : आपल्यासोबत अकरा आमदार असल्याचा दावा आमदार बच्चू कडू यांनी नागपूर येथे पत्रकार परिषद घेऊन केला. त्या पत्रकार परिषदेत त्यांच्यासोबत एकही आमदार नव्हता. इतकेच काय तर त्यांच्या पक्षातून निवडून आलेले आमदार देखील पत्रकार परिषदेला उपस्थित नव्हते याचाच अर्थ त्यांच्यासोबत एकही आमदार नाही. यामुळे आपल्याला मंत्रिमंडळात सहभागी करून घ्यावे, यासाठी केवळ दबाव आणण्याचा प्रयत्न आमदार बच्चू कडू करीत असल्याचे गोपाळ तिरमरे ( BJP General Secretary Gopal Tirmare )यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.