अमरावती - अमरावती जिल्ह्यात मागील काही दिवसापासून कोरोनाबाधित रुग्णांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे आजपासून (रविवार) 15 मेपर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे दुकान बंद राहणार आहे. शहरातही कडक लॉकडाऊनला सुरुवात झाली असून शहरात 20पेक्षा जास्त ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. अमरावती शहराच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह या आज स्वतः रस्त्यावर उतरुन वाहनांची विचारपूस केली. जे नागरिक काम नसताना शहरात फिरत आहे, अशा नागरिकांवर आता शहर पोलिसांनी कडक कारवाईला सुरुवात केली आहे. तसेच पेट्रोल पंपावर फक्त अत्यावश्यक सेवा व शासकीय वाहनांना पेट्रोल दिले जाणार आहे. पेट्रोल पंपावर एक पोलीस कर्मचारी देखील तैनात करण्यात आला आहे.
अमरावतीत कडक लॉकडाऊन सुरुवात; पोलीस आयुक्त उतरल्या रस्त्यावर - कडक लॉकडाऊन सुरुवात
अमरावती शहराच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह या आज स्वतःहा रस्त्यावर उतरुन वाहनांची विचारपूस केली. जे नागरिक काम नसताना शहरात फिरत आहे, अशा नागरिकांवर आता शहर पोलिसांनी कडक कारवाईला सुरुवात केली आहे. तसेच पेट्रोल पंपावर फक्त अत्यावश्यक सेवा व शासकीय वाहनांना पेट्रोल दिले जाणार आहे.