अमरावती - परतवाडा येथील मुगलाई परिसरात बुधवारी पहाटे अस्वल आढळून आले. भर वस्तीत अस्वल शिरल्याने परतवाडा शहरात चांगलीच खळबळ उडाली होती. मुगलाई या परिसरारचा मार्ग थेट सातपुडा रांगेत मेळघाटातील बेलखेडा या गावात पोहोचतो. त्यामुळे बेलखेडा परिसरातून अस्वल पहाटे मुगलाई परिसरातून परतवाडा शहरात आले.
अस्वल गावात येत असताना अनेकांच्या घरासमोर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याने ते दृश्य टिपले. दरम्यान, अस्वल गावात आल्याने परातवाड्यात खळबळ उडाली. अस्वल नेमके कुठे गेले असावे, याचा शोध वनविभागाचे कर्मचारी घेत आहेत.
परातवाड्यामध्ये अस्वल आढळल्याने खळबळ; वनविभागाची शोधमोहीम सुरू - Bear amravati
परतवाडा येथील मुगलाई परिसरात बुधवारी पहाटे अस्वल आढळून आले. भर वस्तीत अस्वल शिरल्याने परतवाडा शहरात चांगलीच खळबळ उडाली होती.
![परातवाड्यामध्ये अस्वल आढळल्याने खळबळ; वनविभागाची शोधमोहीम सुरू Bear amravati](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6626846-821-6626846-1585765356076.jpg?imwidth=3840)