ETV Bharat / state

Amravati News : अकोल्याच्या संस्थेची मेळघाटात आगळीवेगळी 'सेवा'; 14 शाळांच्या पालकत्वाची घेतली जबाबदारी

सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या जिल्ह्यातील मेळघाट या आदिवासी भागात शिक्षणासाठी विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी यासाठी अकोला येथील सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या ( Bahuuddeshiya Seva Sanstha ) वतीने विशेष पुढाकार घेण्यात आला आहे. एकूण 14 शाळांचे 1198 चिमुकल्यांना संपूर्ण वर्षभर पुरेल इतके शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.

Door of Service School
सेवा शाळेच्या दारी
author img

By

Published : Aug 14, 2023, 5:43 PM IST

माहिती देताना प्रतिनिधी

अमरावती : मेळघाटातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या आदिवासी बांधवांच्या चिमुकल्यांना शासनाकडून मोफत पुस्तके मिळतात. मात्र वर्षभर लागणारे शालेय साहित्य जंगलात कुठेही उपलब्ध होत नाही. चिखलदरा तालुक्यात येणाऱ्या सलोना सर्कलमधील एकूण 14 शाळांचे पालकत्व स्वीकारणाऱ्या अकोला येथील सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने, यावर्षी दऱ्याखोऱ्यात आणि पहाडाच्या उंच टोकांवर वसलेल्या सर्व गावातील शाळांच्या दारी जाऊन 1198 चिमुकल्यांना शालेय साहित्य वाटप केले. विद्यार्थ्यांच्या हाती लाभलेल्या या शालेय साहित्यामुळे शिक्षकांना देखील आनंद झाला आहे. ( Guardianship of 14 schools in Melghat )

असा आहे हा उपक्रम : अकोला येथील सेवा बहुउद्देशीय संस्था ही 2012 पासून विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. गत चार वर्षांपासून मेळघाटातील विद्यार्थ्यांना मदत व्हावी यासाठी संस्थेने पुढाकार घेतला. गतवर्षी या चौदाही शाळेतील विद्यार्थ्यांना घटांग या गावात एकत्र करून त्यांना शालेय साहित्य वितरित करण्यात आले. तसेच प्रत्येक शाळेची गरज ओळखून त्यांना हव्या असणाऱ्या गरजेच्या वस्तू देखील संस्थेच्या वतीने देण्यात आल्या. विशेष म्हणजे कधी नव्हे ते पहिल्यांदाच या चौदाही शाळेतील चिमुकल्यांचे स्नेहसंमेलन देखील सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. यावर्षी शैक्षणिक क्षेत्राला सुरुवात होताच प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक विषयाच्या वह्या, रजिस्टर तसेच पेन, पेन्सिल, कंपास असे सर्वच महत्त्वपूर्ण साहित्य वितरित करण्यात आले.

सलग दोन दिवस चालला उपक्रम : सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने घटांग, मसुंडी, बेला, कोहना, जैतादेही, बिहाली, हत्तीघाट, सलोना, भवई, जामलीवन, ढोमणीफाटा, लवादा आणि भांद्री या 14 गावांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत असणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आले. सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने गतवर्षी 14 शाळेतील एकूण 250 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरित केले होते. यावर्षी मात्र शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला हा लाभ मिळाला आहे. गतवर्षी ज्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळाले होते, त्यांच्या शिक्षणात प्रगती जाणवली असल्याची माहिती, घटांग येथील आदर्श शिक्षक वैजनाथ इप्पर यांनी दिली.

विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला : आता या सर्वच शाळेतील विद्यार्थ्यांजवळ शैक्षणिक साहित्य उपलब्ध झाल्यामुळे यावर्षी प्रगतीचा आलेख नक्कीच छान वाढले. सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने गतवर्षी सर्वोच्च शाळांचे एकत्रित स्नेहसंमेलन घेतले होते. त्यामुळे जिल्हास्तरावर झालेल्या लोकनृत्य स्पर्धेत देखील आमच्या चौदाही शाळेतील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला. तर चम्मू ही जिल्हास्तरीवरील स्पर्धेत विजेती ठरली असे देखील वैजनाथ इप्पर म्हणाले.

विद्यार्थ्यांचा आनंद हेच समाधान : आम्ही फार काही मोठे काम करतो आहे असे अजिबात नाही. मात्र समाजाचे काहीतरी देणे असते या उद्देशाने मेळघाटातील 14 शाळेचे पालकत्व आम्ही आमची जबाबदारी म्हणून स्वीकारले. या चौदा ही शाळेतील विद्यार्थी शिकावेत पुढे जावेत हाच आमचा हेतू आहे. आमच्या या थोड्याशा प्रयत्नातून आम्ही यावर्षी अकराशेच्यावर विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारले असून, त्यांना वर्षभर शाळेत शिकताना लागणारे शालेय साहित्याचे वाटप आम्ही करत आहोत. जी काही मदत आमच्या वतीने मेळघाटातील विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्यासाठी कामी पडेल ती आम्ही करण्याचा प्रयत्न करू असे, सेवा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष वैभव वानखडे यांनी सांगितले.

प्रत्येक शाळेत झाले स्वागत : सेवा बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शालेय साहित्याच्या वाहनासह प्रत्येक शाळेत पोहोचले असताना, त्यांचे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या वतीने स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्याला शालेय साहित्य मिळाल्यामुळे शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी आनंद व्यक्त केला. तसेच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरदेखील आनंदाचे भाव झळकत होते.

हेही वाचा -

  1. Waste Disposal Stick : कचऱ्याची विल्हेवाट लावायची? 'ही' घ्या हातात काठी!
  2. Tribal Dance In Melghat: मेळघाटातील हिरव्यागार जंगलामध्ये आदिवासींनी धरला ठेका, पहा त्यांच्या नृत्याविष्काराचे खास रंग
  3. Velvet Insect : पावसाळ्यात हमखास दिसणारा मखमली किडा होतोय दुर्मिळ; जंगल वाचवण्यात आहे महत्त्वाचा वाटा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.