ETV Bharat / state

खासदार नवनीत राणापाठोपाठ बडनेराचे आमदार रवी राणाही 'कोरोना पॉझिटिव्ह'

गुरुवारी दुपारी खासदार नवनीत राणा कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली होती. यानंतर, कोरोनाग्रस्त आई-वडिलांच्या उपचारासाठी दोन दिवसांपासून नागपुरला असणारे बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा हे सुध्दा कोरोनाग्रस्त असल्याचा अहवाल गुरुवारी सायंकाळी प्राप्त झाला.

author img

By

Published : Aug 6, 2020, 10:10 PM IST

आमदार रवी राणा
आमदार रवी राणा

अमरावती : खासदार नवनीत राणा यांच्या पाठोपाठ त्यांचे पती आणि बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. गुरुवारी दुपारी खासदार नवनीत राणा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आल्यावर कोरोनाग्रस्त आई-वडिलांच्या उपचारासाठी दोन दिवसांपासून नागपुरला असणारे आमदार रवी राणा हे सुध्दा कोरोनाग्रस्त असल्याचा अहवाल गुरुवारी सायंकाळी प्राप्त झाला.

अमरावतीच्या शंकर नगर परिसरात आमदार रवी राणा यांचे घर आहे. त्यांच्या घरात आई-वडिलांसह भाऊ, वहिनी दोन पुतणे पत्नी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे दोन मुलं असे एकूण दहाजण राहतात. राखी सणाच्या निमित्ताने आमदार रवी राणा यांची नागपुरला राहणारी बहीण आणि अमरावतीत राहणारे जावई हे घरी आले होते. दरम्यान, आमदार राणा यांच्या वडिलांना 2 ऑगस्ट रोजी कोरोना असल्याचे समोर येताच घरात असणाऱ्या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात आई-वडिलांसह जावई, बहीण, दोन भाचे, पुतण्या आणि वाहिनीसह त्यांच्या अंगरक्षकला कोरोना असल्याचे समोर आले होते. तर, दुसऱ्या दिवशी 3 ऑगस्टला आमदार राणा यांच्या दोन्ही मुलांना कोरोना असल्याचे स्पष्ट झाले. गुरुवारी सकाळी खासदार नवनीत राणा यांनाही अस्वस्थ वाटायला लागल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असता त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान सायंकाळी आमदार रवी राणा यांना कोरोना असल्याचा अहवाल नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्ययाकडून प्राप्त झाला. आमदार राणा हे आई-वडिलांसह नागपुरलाच आहेत. तर, घरातील इतर सर्व सदस्यांवर अमरावतीतच उपचार सुरू आहेत. आमदार राणा यांचे मोठे भाऊ वगळता संपूर्ण राणा कुटुंब कोरोनाग्रस्त झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.