ETV Bharat / state

Prahar PC On Election: बच्चू कडू अमरावतीत लोकसभेच्या निवडणुकीत ताकद अजमावणार

बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने सोलापुरात जाहीर पत्रकार परिषद घेत लोकसभा व विधानसभेच्या जागा लढवणार असल्याची घोषणा केली. पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांची रविवारी सोलापुरातील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद पार पडली. बच्चू कडू हे स्वतः अमरावतीत लढणार असल्याची घोषणा केली.

Prahar PC On Election
बच्चू कडू
author img

By

Published : Jun 4, 2023, 9:10 PM IST

प्रहार जनशक्ती पक्षाची पत्रकार परिषद

सोलापूर: प्रहार जनशक्ती पक्ष महाराष्ट्रातील लोकसभेच्या 2 जागा व विधानसभेच्या 15 जागा लढवणार असल्याची घोषणा करण्यात आली. अमरावती व रावेर(जळगाव) या दोन लोकसभा मतदार संघात प्रहार आपले उमेदवार उभे करणार आहे.

अस्तित्वासाठी निवडणुका लढणार: भाजप व शिंदे गटाला प्रहार जनशक्ती पक्षाने पाठिंबा दिला आहे. प्रहारचे बच्चू कडू हे राज्य सरकारमध्ये सत्तेचे भागीदार आहेत; मात्र आगामी महानगरपालिका, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्ष स्वतंत्र लढणार आहे. भाजपने किंवा शिंदे गटाने प्रहारसाठी जागा सोडल्या नाही तर प्रहार स्वतंत्र आणि भाजप-शिंदे गटाच्या विरोधात लढेल, अशीही घोषणा करण्यात आली. प्रहारला आपले अस्तित्व टिकवण्यासाठी लढावे लागेल, अशीही माहिती यावेळी पदाधिकऱ्यांनी दिली.

शेतकरी संघटनांचा भाजपला विरोध: सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यात माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख विद्यमान आमदार आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप गावातील शेकडो एकर शेत जमिनीवर 'एमआयडीसी'चे नाव चढले होते. शेतकऱ्यांची बाजू घेत प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकऱ्यांनी भाजप आमदार सुभाष देशमुख विरोधात मोर्चेबांधणी करत घेराव घातला होता. अनेक शेतकरी संघटना व ग्रामीण भागातील नागरिक भाजप आमदाराविरुद्ध आहेत. याचाच फायदा प्रहार जनशक्ती पक्ष घेत असून सोलापूर शहर अध्यक्ष अजित कुलकर्णी दक्षिण सोलापूर तालुक्यात आगामी उमेदवार असतील. ते भाजपविरोधात लढणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच करमाळा विधानसभा मतदार संघातून प्रहारचे दत्ता म्हस्के पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.

बच्चू कडू विरुद्ध रवी राणा संघर्ष: अचलपूरचे आमदार बच्चू कडू, बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यात राजकीय टोकाचा वाद आहे. आमदार रवी राणा यांच्या पत्नी या अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार असून अमरावती लोकसभा मतदार संघ हा प्रहार जनशक्ती पक्षाला मिळावा यासाठी बच्चू कडू यांनी भाजप, शिवसेना शिंदे गटाकडे प्रस्ताव मांडला आहे. बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघावर दावा केल्यामुळे विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. खासदार नवणीत राणा, आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात अमरावती मतदारसंघात उमेदवार असतील का? तसेच अमरावतीत राजकारणाची आणखी काही नवी सूत्रे समोर येतील का? याबाबत आता चर्चा रंगायला लागली आहे.

हेही वाचा:

  1. Politics News : राष्ट्रवादीला धक्का; 'या' आमदारांच्या भावाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
  2. Churni Village Gum : हिरड्यामुळे झाले मेळघाटातील चुरणी समृद्ध; वनौषधींना बाजारात मोठी मागणी
  3. Bhaskar Jadhav on BJP : भाजप कोणाचा पक्ष? भास्कर जाधवांनी थेटच सांगितले...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.