अमरावती - कृषी विधेयक कायद्याच्या विरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. यात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. तीन तारखेपर्यंत दिल्लीच्या शेतकऱ्यांचा तोडगा निघाला नाही तर, आम्ही दुचाकीने हजारो कार्यकर्ते घेऊन बैतुलमार्गे दिल्लीला जाऊन शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणार, असा इशारा बच्चू कडू यांनी अमरावतीत बोलताना दिला.
हेही वाचा - शेतकरी आहेत म्हणून देश आहे; मोदींनी त्यांच्याशी चर्चा करायला हवी..'
केंद्र सरकारने सर्व शेतकऱ्यांना सन्मानाने दिल्लीत येऊ द्यावं व त्यांच्याशी प्रामाणिकपणे संवाद करावा, असेही बच्चू कडू यांनी सांगितले. यवतमाळ येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 50 टक्के नफा देऊन हमी भाव देतो सांगितले होते व शेतकऱ्यांना हे वचन दिले होते, असेही कडू यांनी सांगितले.
हेही वाचा - सकल मराठा समाज : 'पक्ष सोडून कोणत्याही नेत्यांनी आमच्यासोबत यावं'