अमरावती - प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी आता दिव्यांगांच्या विविध मागण्यासाठी थेट दिल्लीत धडक दिली आहे.९ऑगस्टला क्रांतीदिनी दिल्लीत आंदोलनाची धमकी दिल्ली सरकारला दिली आहे. आज आंदोलनाच्या पूर्वसंध्येला देशातील हजारो दिव्यांग दिल्लीत दाखल झाले आहे.
आमदार बच्चू कडू आक्रमक व लक्षवेधी आंदोलनाने नेहमी चर्चेत असतात. त्यामुळे महाराष्ट्रात आक्रमक आंदोलन करणारा आमदार थेट दिल्लीत दिव्यांगांसह दाखल झाल्याने दिल्ली सरकारने पोलीस सुरक्षा वाढवली आहे. दिव्यांग हक्क कायदा २०१६नुसार दिव्यांगाच्या आर्थिक व सामाजिक पुनर्वसन कार्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला निधी द्यावा. यासह अपंगांच्या मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी महाराष्ट्रात विविध आंदोलने केली आहेत. मात्र, दिव्यांगांच्या मागण्याकडे राज्यसरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे.
त्यामुळे बच्च कडू यांनी देशातील १५हजार दिव्यांगां सोबत घेत दिल्लीत आंदोलनासाठी आज धडक दिली आहे. उद्या अपंगांच्या विविध मागण्यांसाठी दिल्लीत ९ऑगस्टला क्रांती दिनी बच्चू कडू यांनी दिल्लीत आंदोलन करण्याचा इशारा दिल्ली पोलिसांना दिला आहे. त्यामुळे पोलिसांनी या आंदोलनाचा धसका घेतला आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.