ETV Bharat / state

"कांद्याचे दर वाढले म्हणून बोंबलू नका; झेपत नसेल तर लसूण, मुळा आणि गाजर खा" - कांद्याच्या किंमती

कांद्याच्या दरवाढीचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जाहीर समर्थन केले आहे. जर कोणाला कांदा जास्तच आवडत असेल आणि भाव जास्त वाटत असेल तर त्यांनी लसूण किंवा मुळा खावा पण कांदा महाग झाला म्हणून ओरडू नये, असा सल्ला कांदा महाग झाला म्हणून ओरडणाऱ्यांना राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे.

राज्यमंत्री बच्चू कडू
राज्यमंत्री बच्चू कडू
author img

By

Published : Oct 21, 2020, 10:28 AM IST

अमरावती - कांद्याचे दर ६० रुपयांच्या वर गेल्याने सर्वसामान्य लोकांची कुजबुज वाढत आहे. मात्र कांद्याच्या दरवाढीचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जाहीर समर्थन केले आहे. लोकांनी भाव वाढले म्हणून ओरडू नये, कांद्याचे भाव आणखी वाढले पहिजेत, कारण मागील सत्तर वर्षात कांदा उत्पादक शेतकरी लुटला गेला आहे असे ते म्हणाले.

"कांदा वाढला म्हणून बोंबलू नका : झेपत नसेल तर लसूण, मुळा आणि गाजर खा"

कांदा परवडत नसेल तर लसूण-मुळा खा..

जर कोणाला कांदा जास्तच आवडत असेल आणि भाव जास्त वाटत असेल तर त्यांनी लसूण आणि मुळा खावा पण कांदा महाग झाला म्हणून ओरडू नये, असा सल्ला कांदा महाग झाला म्हणून ओरडणाऱ्यांना राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे. यावर्षी ऐन कांदा काढणीच्या वेळेला अवकाळी पाऊस आल्याने कांदा उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळे आता कांद्याचे भाव ६० रुपयांच्यावर गेले आहे. परंतु कांद्याचे भाव वाढले म्हणणाऱ्यांना बच्चू कडू यांनी सुनावले आहे.

माध्यमांनाही लगावले टोले..

यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी माध्यमांना देखील टोले लगावले आहेत. भाव वाढले तर लगेच तुम्ही स्वयंपाक खोलीत कॅमेरा घेऊन जाल आणि गृहिणीच्या डोळ्यात पाणी आले असे दाखवाल. तर माध्यमांनी देखील असे करू नये, कारण कांदा खाल्ला नाही तर कोणी मरणार नाही. मात्र, कांद्याचे भाव पडले तर शेतकरी नक्की मरेल, त्यामुळे कांद्याचे भाव आणखी वाढले पाहिजे असल्याची भावना कडू यांनी व्यक्त केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.