अमरावती - नेहमी विविध आंदोलनांनी चर्चेत राहणारे प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी कुठलेही शक्ती प्रदर्शन न करता उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्याअगोदर बच्चू कडूंनी शेकडो कार्यकर्त्यांसह रक्तदान केले.
हेही वाचा - ...म्हणून आक्रमक असलेल्या आमदार यशोमती ठाकूर गहिवरल्या
काही दिवसांपूर्वी अमरावतीच्या परतवाडा शहरात क्षुल्लक वादातून एकाची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर शहरात तणाव निर्माण झाला. यातूनच दोन गटाच्या हाणामारीत आणखी दोन लोकांचा बळी गेला. तणावाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता नांदावी यासाठी संचार बंदी लागू करण्यात आली होती. सर्व कार्यकर्त्यांनी शहरात शांतता राखण्यास मदत करावी, असे आवाहन बच्चू कडू यांनी केले.