अमरावती - येत्या दहा दिवसात शेतकरी आंदोलनाचा तोडगा न निघाल्यास पुन्हा रेल्वेने 10 हजार शेतकऱ्यांसह दिल्लीत धडक देऊ, असा इशारा प्रहार संघटनेचे अध्यक्ष व राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे. हरयाणातील पलवल येथे शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी पोहोचले असता ते बोलत होते.
'पेटलेले रान विझता कामा नये'
दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बच्चू कडू यांनी बाइक रॅली काढून दिल्लीत धडक देऊन आंदोलन केले होते. दिल्लीत त्यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला, तर जोपर्यंत शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय लागत नाही, तोपर्यंत हे पेटलेले रान विझता कामा नये, असे कडू यांनी सांगितले. बच्चू कडू हे हजारो शेतकऱ्यांसह बाइक रॅली काढून 6 दिवसाच्या प्रवासानंतर दिल्लीत दाखल झाले होते. तेथे त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.