अमरावती- राज्यमंत्री बच्चू कडू हे मागील १० दिवस क्वारंटाइन होते. तेव्हा त्यांनी जनतेला आणि आपल्या कार्यकर्त्यांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले होते. मात्र, आता ते बरे झालेले असुन त्यांनी रोजगाराअभावी जेवणापासून जे वंचित आहेत, अशांसाठी ८ एप्रील ते १४ एप्रिल "चला चुल पेटवु या" या अभियानाला सुरवात केलेली आहे.
जेवण नाहीतर जीवन महत्वाचे आहे आणि रोजगार सुद्धा महत्वाचा आहे तरच जेवण मिळेल, असे हे सुद्धा नागरिकांनी लक्षात घेतले पाहिजे, असे बच्चू कडू यांनी सांगतिले.जर तुमच्या सेवेमुळे संसर्ग पसरत असेल तर तुमचे काम शुन्य असेल अशा सेवेला काहीही महत्व नाही. त्यामुळे सावधगिरीने काम करण्याची ही वेळ आहे, असे देखील ते म्हणाले आहेत.
एका गरजू कुटुंबाला किमान २०० ते ५०० रुपयांची मदत देऊन आपण ऊपाशी घरातील चुल पेटवू शकतो. तर स्वत:ची जेवढी क्षमता असेल तेवढीच मदत करा, यासाठी वर्गणी गोळा करू नका, असा सल्ला बच्चू कडूंनी कार्यकर्त्यांना दिला आहे. ८ एप्रिलची हनुमान जयंती ,११ एप्रिल महात्मा फुले जयंती आणि १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कोरोनामुक्त करायची आहे. त्यासाठी जनतेने घरामध्येच राहावे, असे आवाहन बच्चू कडुंनी केले.