ETV Bharat / state

अमरावती : माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या घरावर हल्ला; चांदूर रेल्वे शहरात तणाव - वीरेंद्र जगताप ताज्या बातम्या

विजयानंतर वीरेंद्र जगताप यांनी ढोल वाजवत बच्चू कडू यांच्या बद्दल अपशब्द वापरल्याचा व्हिडीओ व्हायरल करत प्रहार कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात आंदोलन केले होते. त्याचाच भाग म्हणून आज सकाळी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या निवासस्थानी 10 ते 12 प्रहारच्या कार्यकर्त्यांनी दोन गाड्यांमध्ये येऊन भ्याड हल्ला केला.

amravati latest news
amravati latest news
author img

By

Published : Oct 8, 2021, 6:47 AM IST

अमरावती - जिल्हा बँकेच्या निवडणुकीत लागलेल्या निकालाचे पडसाद जिल्ह्यात उमटायला लागले असून गुरुवारी प्रहार कार्यकर्त्यांनी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या चांदूर रेल्वे येथील घरावर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या घरावर दगडफेक केली. या घटनेमुळे चांदूर रेल्वे शहरात तणाव निर्माण झाला आहे.

जिल्हा बँकेच्या हायप्रोफाईल निवडणुकीनंतर जिल्ह्यात त्याचा प्रभाव पाहायला मिळत आहे. विजयानंतर वीरेंद्र जगताप यांनी ढोल वाजवत बच्चू कडू यांच्या बद्दल अपशब्द वापरल्याचा व्हिडीओ व्हायरल करत प्रहार कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात आंदोलन केले होते. त्याचाच भाग म्हणून आज सकाळी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या निवासस्थानी 10 ते 12 प्रहारच्या कार्यकर्त्यांनी दोन गाड्यांमध्ये येऊन भ्याड हल्ला केला. जगताप यांचा पुतळाही जाळला.

हल्लेखोरांना चोप -

प्रा. वीरेंद्र जगताप यांच्या घरावर हल्ला करून पळ काढणाऱ्या प्रहरच्या कार्यकर्त्यांना अमरावती मार्गावर संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी पकडून चांगलाच चोप दिला. यानंतर त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी विविध गुन्हे दाखल करीत सर्व आरोपींना अटक केली.

काँग्रेस पदाधिकाऱ्यांची पोलीस ठाण्यात धाव -

घटनेची माहिती वाऱ्यासारखी संपूर्ण जिल्ह्यात पोहचताच काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, आमदार बळवंत वानखडे जिल्हा परिषद सभापती बाळासाहेब हिंगणिकर, माजी शिक्षण व आरोग्य सभापती गणेश आरेकर, नगराध्यक्ष निलेश सूर्यवंशी, उपाध्यक्ष देवानंद खुणे, पंचायत समिती सदस्य अमोल होले युवक काँग्रेस सरचिटणीस परीक्षित जगताप, शहराध्यक्षा निवास सूर्यवंशी यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

बच्चू कडू यांना पराभव पचविता आला नाही -

स्वतःला शेतकरी नेते म्हणणारे, राज्यमंत्री बच्चू कडू यांना जिल्हा बँकेत पॅनलचा झालेला दारुण पराभव पचविता आला नाही म्हणून आईवर शिवीगाळ केल्याचा खोटा आरोप करीत कार्यकर्त्यांचे माथे पेटविण्याचे काम ते करीत आहे. आज त्यांच्या गुंडांनी केलेला भ्याड हल्ला म्हणजे महाराष्ट्राला बिहार करण्याचा प्रकार असल्याचे मत माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी व्यक्त केले.

हल्लेखोरांना अटक करण्याची कारवाई सुरू -

आज शहरात दोन गाड्या भरून आलेल्या 10 ते 12 हल्लेखोरांनी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या घरावर हल्ला करीत दगडफेक केली. त्यांचा पुतळा जाळला तुम्हाला बघून घेऊ, मारू अशा प्रकारच्या धमक्या दिल्या त्यावरून सर्व हल्लेखोरांना ताब्यात घेउन प्रा जगताप यांच्या तक्रारीवरून अटकेची कारवाई सुरू आहे. शहरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे, अशी माहिती अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक शशिकांत सातव यांनी दिली.

वीरेंद्र जगताप यांचा पुतळा जाळला -

'बच्चू कडू यांना पराभव पचविता आला नाही' -

आज शहरात दोन गाड्या भरून आलेल्या 10 ते 12 हल्लेखोरांनी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या घरावर हल्ला करीत दगडफेक केली. त्यांचा पुतळा जाळला तुम्हाला बघून घेऊ, मारू अशा प्रकारच्या धमक्या दिल्या त्यावरून सर्व हल्लेखोरांना ताब्यात घेउन प्रा. जगताप यांच्या तक्रारीवरून अटकेची कारवाई सुरू आहे. शहरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे, अशी माहिती अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक शशिकांत सातव यांनी दिली.

हेही वाचा - 2022 महापालिका निवडणूक; शिवसेनेने पालिका निवडणुकीचे फुंकले रणशिंग

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.