अमरावती - धामणगाव रेल्वे शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे किशोर साकुरे यांना ९ हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. तसेच पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेले अभियंता परिमल यांच्यावर ४ हजारांची लाच घेताना कारवाई करण्यात आली होती.
हेही वाचा वीज वितरण कंपनीच्या शाखा अभियंत्याला लाच घेताना पकडले
याआधी नायब तहसीलदारांना ५ हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली होती. एकाच महिन्यात धामणगाव रेल्वे शहरात भ्रष्टाचाराच्या ३ घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.