ETV Bharat / state

माणसांची वस्ती लॉकडाऊन; वन्य प्राण्यांचा जंगलात मुक्तसंचार - melghat jungle

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सध्या माणसांच्या वस्तीत लॉकडाऊन आहे. तर, माणसांचा सध्या कुठलाही हस्तक्षेप नसणाऱ्या जंगलामध्ये वन्य प्राण्यांचा मुक्तसंचार सुरू आहे. कोरोनाच्या संकटामुळे माणसं चिंतेत असताना वन्यप्राणी मात्र जंगलात निश्चिंत वावरत आहेत.

माणसांची वस्ती लॉकडाऊन; वन्य प्राण्यांचा जंगलात मुक्तसंचार

author img

By

Published : Apr 21, 2020, 12:42 PM IST

अमरावती - जिल्ह्यात मेळघाट हे सर्वाधिक मोठे जंगल क्षेत्र असून जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे पोहरा-चिरोडी जे जंगल अमरावती शहराला लागून आहे. जगभरात सध्या कोरोनाने उच्छाद घातला असताना अमरावती शहरासह जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामीण भागात माणसे जास्तीजास्त वेळ घरात बसून आहेत. यामुळे सध्या शहरालगत असणाऱ्या जंगलात कोणीही लाकूड तोडायला जात नाही किंवा अवैध दारू काढायलाही जाणे टाळत आहे. जंगलाशी असणारा माणसांचा संपर्क महिनाभरापासून तुटला असल्याने पोहरा, चिरोडी या जंगलात नीलगाय, हरीण, रान गवे हे प्राणी बिनधास्त संचार करीत आहेत. या जंगलात 25 ते 30 च्या आसपास असणारे बिबट ही कुठल्याही अडथळ्यांविना जंगलात फिरत आहेत.

माणसांची वस्ती लॉकडाऊन; वन्य प्राण्यांचा जंगलात मुक्तसंचार

या जंगलातून अमरावतीकडून वर्धा, चांदूर-रेल्वे या गावांना जोडणारा मुख्य मार्ग आहे. महिनाभरापासून राज्य परिवहन मंडळाच्या बसगाड्या, दिवसभर पळणारे ट्रक आणि छोटी मोठी वाहने आणि दुचाकीस्वार या मार्गावरून गेलेच नसल्याने हा संपूर्ण परिसर 24 तास सामसुम आहे. या मार्गावरील हॉटेल, धाब्यानांही कुलूप लागले आहे. या जंगलाला लागून दररोज अनेक रेल्वेगाड्या मुंबई- नागपूर, नागपूर -मुंबई या दिशेने जातात. सध्या रेल्वेगाड्याही बंद असल्यामुळेही पहाटे, रात्री, मध्यरात्री गाडीचा येणार आवाज बंद आहे. एखादे छोटे वाहन किंवा एखादा दुचाकीस्वार चुकून या मार्गाने गेला असेल तर त्याने निश्चितच जीव मुठीत धरूनच आपले गाव गाठले असावे. इतकी भयाण शांतता या मार्गावर आहे. या जंगलातील विद्यपीठाचा तलाव वगळता इतर तलावांना बऱ्यापैकी पाणी आहे. त्यामुळे पोहरा चिरोडी जंगलातील वन्यप्राणी मानवी वसाहतीत येण्याचा धोका सध्या तरी अजिबात नाही.

जिल्ह्यातील सर्वात महत्वाचे जंगल असणाऱ्या मेळघाटात वन अधिकारी आणि वन मजुरांनाही जाण्यास अनेक बंधने घालण्यात आली आहे. ग्रामस्थांनी घराबाहेर निघू नये. जंगलात जाऊ नये यासाठी प्रत्येक गावात दवंडी देण्यात आली असून जंगलात कोणीही जाणार नाही याची काळजी वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घेत असल्याची माहिती अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवासा रेड्डी यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली. 30 एप्रिलपर्यंत आम्ही मेळघाटासह आमच्या अधिकार क्षेत्रात येणारे अकोला, बुलडाणा, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील अभय अरण्यात कोणत्याही पर्यटकाला फिरण्याची परवानगी देण्यात आली नाही, असेही श्रीनिवासा रेड्डी म्हणाले.

amravati

जंगलामध्ये वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी जे पाणवठे आहेत. त्यात पाणी भरताना आमच्या कर्मचाऱ्यांच्या हाताचा स्पर्श होणार नाही, याची खबरदारीही घेतली जात आहे. वन्यप्राण्यांध्ये कोविडची लागण होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. मेळघाटात सर्व वन्यप्राणी सध्या जंगलात मुक्त संचार करत असल्याचेही श्रीनिवास रेड्डी यांनी सांगितले.

सध्या स्थितीत मेळघाटात झाडांना पानगळ सुरू झाली आहे. अति खोलगट भागत असणारे पाण्याचे स्रोत येथे बाराही महिने आहेत. त्यामुळे जंगलातील पट्टेदार वाघासह सर्व मांसाहारी, तृणभक्षक प्राण्यांसह पक्षांचीही पाण्याची व्यवस्था जंगलात आहे. लॉकडाऊनमुळे जंगलात जाणाऱ्या माणसांवर कठोर कारवाईचे निर्देश असल्यामुळे ज्या नद्या, तलावापर्यंत माणसांचा संचार असायचा त्या भागात आता वन्यप्राणी आपली तृष्णा भागवत आहेत. एकूण माणसांमध्ये कोरोनाची भीती असताना वन्यप्राण्यांच्या विश्वात अच्छे दिन आले आहेत.

प्राण्यांनाही माणसांची ओढ

सद्या लॉकडाऊनमुळे मेळघाटासह जिल्ह्यातील सर्व जंगल क्षेत्रात प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास हा शांत आणि सुरक्षित निश्चितच झाला आहे. असे असताना मेळघाटाच्या पायथ्याशी असणाऱ्या जंगलातील हरीण, माकडे, बिबट आणि अस्वल यांना माणसांची ओढ असल्यामुळे हे प्राणी बरेचदा माणसांच्या सहवासात स्वतःला सुरक्षित समजतात. यामुळे हे प्राणी अनेकदा मानवी वस्तीत येतात. परतवाडा शहरात आता काही दिवसांपूर्वी आलेला अस्वल हा त्याचाच भाग होता. अमरावती शहरालगतच्या जंगलातील हरणांसह बिबट हा नेहेमीच मानवी वस्तीलगत वावरतातना आढळतो. अमरावती शहरातील बांबू गार्डन तसेच राज्य राखीव पोलीस दल वसाहतीच्या परिसरात बिबट नेहमी आढळतो. लॉककडाऊनच्या काळात जंगलात माणसं जात नसली तरी माणसांचा शोध घेत बिबट नेहमी मानवी वस्तीलगत येतो, अशी माहिती उपवन संरक्षक गजेंद्र नरवणे आणि वन्यजीव अभ्यासक मुकेश चौधरी यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.