अमरावती : आता व्हॅलेंटाईनडेचा सीजन सर्वत्र साजरा होत असताना वर्षभरापूर्वी हॅलो लग्न झाले असतानाही एकमेकांपासून साता समुद्रा पार असणाऱ्या आपल्या बायकोला भेटायला थेट अमेरिकेतून जावईबापू दर्यापुरात आले आहेत. सध्या अमेरिकेतील ह्या जावईबापूंची दर्यापुरात चांगलीच चर्चा असून दर्यापूरकरांच्या पाहुणचाराचा आस्वाद सध्या अमेरिकेचे हे जावईबापू घेत आहेत.
अमेरिकन वऱ्हाड दर्यापुरात : विशेष म्हणजे दोघांनीही पसंती दर्शविल्यावर अंड्र्यू रॉबिन्स यांचे अमेरिकेत असणारे आई-वडील तसेच सश्रद्धा मस्के यांच्या आई वडिलांची सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख करून दिल्यावर दोन्ही कुटुंबीयांनी या लग्नासाठी संमती दर्शविली. कोरोनामुळे दोन वर्ष अँड्यू रॉबीन्सन आणि श्रद्धाला लग्न करता आले नाही. मात्र 2 फेब्रुवारी 2022 रोजी दर्यापूर येथे मोठ्या थाटात अंड्र्यू रॉबिन्स आणि श्रद्धा मस्के यांचा लग्न सोहळा पार पडला.
दर्यापूर आता अमेरिकेचे जावई आलेत अशी चर्चा संपूर्ण परिसरात रंगली होती. दरम्यान श्रद्धाचा पासपोर्ट तयार झाला मात्र, विजा तयार झाला नसल्यामुळे तिला रॉबिन सोबत अमेरिकेला जाता आले नाही. लग्नानंतर अंड्र्यू रॉबिन्स अमेरिकेला निघून गेला मात्र, श्रद्धा दर्यापुरात होती. दोघांचीही रोज सोशल मीडियाच्या माध्यमातून भेट व्हायची बोलणे व्हायचे. आता लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे अँड्र्यू रॉबिन्स हा 1 फेब्रुवारीला मुंबईला आला. तेथे श्रद्धा त्याला घ्यायला गेली होती. 2 फेब्रुवारीला अँड्र्यू रॉबिन्स सोबत श्रद्धा दर्यापूरला आली.
थाटात केला लग्नाचा वाढदिवस : वर्षभरानंतर अँड्र्यू रॉबिन्सन आणि श्रद्धा या दाम्पत्याची भेट होते आहे. 2 फेब्रुवारीला श्रद्धा च्या घरी या दांपत्याच्या लग्नाचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. अँड्र्यू रॉबिन्सन याने श दोन सोन्याच्या अंगठ्या भेट दिल्या तर श्रद्धा ने अंड्र्यू रॉबिन्सला चांदीचे ब्रेसलेट गिफ्ट केले. केक कापून दोघांनीही लग्नाचा वाढदिवस साजरा केला. यावेळी विविध नृत्यांवर दोघेही थिरकले.
जावईबापूंने मारला पुरणपोळीवर ताव : अमेरिकेतून आलेल्या जावईबापूंसाठी सध्या मस्के कुटुंबामध्ये दररोज मटन, मासोळी शिजते आहे. अँड्र्यू रॉबिन्सन यांना रोजच्या जेवणात मटण फार आवडते. त्याच्यासाठी रोजच मटणाचा पाहुणचार केला जातो आहे. या सोबतच त्याच्यासाठी पुरणाची पोळी देखील केली होती. पुरणाची पोळी देखील त्याने मोठ्या आवडीने खाल्ली असे श्रद्धाने 'ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाली.
श्रद्धाच्या शाळा, महाविद्यालयातही स्वागत : दर्यापूर पासून अवघ्या काही अंतरावर असणारे लासुर येथील आनंदेश्वर हे मंदिर देखील श्रद्धा ने अँड्र्यूला श्रद्धाने दाखवले. लासुर येथील मंदिरात महादेवाचे दर्शन घेतल्यावर अँड्र्यू हा श्रद्धाच्या शाळा, महाविद्यालयातही जाऊन आला. श्रद्धाच्या शाळेत, महाविद्यालयात अँड्र्यूचे जोरदार स्वागत करण्यात आले. मस्के कुटुंबीयांनी आपल्या अमेरिकेतील जावयाला एक दिवस चिखलदऱ्यात देखील फिरवून आणले आहे.
हेही वाचा - Transgender Couple Birth Baby : ट्रान्सजेंडर जोडप्याने दिला बाळाला जन्म! लिंग ओळख सांगण्यास नकार