ETV Bharat / state

Cotton Merchant Protest : अमरावतीच्या कापूस व्यापाऱ्याच्या घरासमोर फसवणूक झालेल्या आंध्रातील व्यापाराचे पत्नीसह आंदोलन - विवेक काकड

व्यवसायात विश्वास ठेवून आंध्र प्रदेशातील एका कापूस व्यापाऱ्याने अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील कॉटन किंग म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या व्यापाऱ्याला 36 लाख रुपये किमतीच्या कापसाच्या 100 गाठी (Amravati district cotton merchant cheated) विकल्या. हा व्यवहार होऊन पाच वर्षे उलटले, तरी एक रुपया देखील मिळाला नसल्याने आपल्याकडील सारेच संपल्यावर आंध्र प्रदेशातील कापूस व्यावसायिकाने आपले पैसे मिळावे यासाठी अपंग पत्नीसह आपल्या घरापासून लांब पाचशे किलोमीटर अंतरावर असणारे अंजनगाव सुर्जी हे गाव गाठले. हे दांपत्य महिनाभरापासून अंजनगाव सुर्जी येथील केशवनगर स्थित कापूस व्यापाराच्या घरासमोर ठिय्या देऊन (Andhra Pradesh cotton merchant protest) आहेत.

cotton merchant protest
आंध्र प्रदेशातील कापूस व्यापाऱ्याची फसवणूक
author img

By

Published : Dec 1, 2022, 2:23 PM IST

अमरावती : व्यवसायात विश्वास ठेवून आंध्र प्रदेशातील एका कापूस व्यापाऱ्याने अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील कॉटन किंग म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या व्यापाऱ्याला 36 लाख रुपये किमतीच्या कापसाच्या 100 गाठी (Amravati district cotton merchant cheated) विकल्या. हा व्यवहार होऊन पाच वर्षे उलटले, तरी एक रुपया देखील मिळाला नसल्याने आपल्याकडील सारेच संपल्यावर आंध्र प्रदेशातील कापूस व्यावसायिकाने आपले पैसे मिळावे यासाठी अपंग पत्नीसह आपल्या घरापासून लांब पाचशे किलोमीटर अंतरावर असणारे अंजनगाव सुर्जी हे गाव गाठले. हे दांपत्य महिनाभरापासून अंजनगाव सुर्जी येथील केशवनगर स्थित कापूस व्यापाराच्या घरासमोर ठिय्या देऊन आहेत. आपल्या हक्काचे पैसे मिळावे, यासाठी कडाक्याच्या थंडीतही या दांपत्याचा संघर्ष पाहून अंजनगाव वासी देखील थक्क झाले (Andhra Pradesh cotton merchant protest) आहेत.

असे आहे संपूर्ण प्रकरण : अंजनगाव सुर्जी येथील रहिवासी विवेक काकड हे परिसरात कॉटन किंग म्हणून ओळखले जातात. विदर्भ आंध्र प्रदेश मध्य प्रदेश या भागातील कापूस खरेदी करून विकणे हा त्यांचा वडिलांपासूनचा व्यवसाय आहे. त्यांच्या वडिलांनी या अनेक कापूस उत्पादक शेतकरी आणि व्यावसायिक त्यांच्याशी जुळले आहेत. आंध्रप्रदेशातील कर्नल जिल्ह्यात येणाऱ्या आदोनी या गावातील कापूस व्यावसायिक रवीप्रकाश सरोदे हे देखील अनेक वर्षांपासून विवेक काकड यांना आपल्या परिसरातील शेतकऱ्यांकडून घेतलेला कापूस विकत असत. 2018 मध्ये रवीप्रकाश सरोदे यांनी विवेक काकडे याला कापसाच्या एकूण शंभर गाठी विकल्या होत्या. त्यावेळी कापसाच्या एका गाठीची किंमत 36 हजार 500 रुपये इतकी होती. या हिशोबाने एकूण 36 लाख 50 हजार रुपये रवीप्रकाश सरोदे यांना विवेक काकड यांच्याकडून घेणे होते. व्यवसायात दगाफटका होणार नाही, असा विश्वास असल्याने रवीप्रकाश सरोदे यांनी एक, दोन महिन्यात आपले पैसे मिळतील म्हणून आपले गाव गाठले. मात्र ज्यावेळी रवीप्रकाश सरोदे यांनी विवेक काकड यांच्याकडे पैशाची मागणी केली, तेव्हा त्यांना सुरुवातीला विविध कारणे सांगून पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात आली. वर्ष, दीड वर्षानंतर त्यांना चक्क पैसे मागितले तर मारण्याची धमकी देखील देण्यात आली. या प्रकाराबाबत रवीप्रकाश सरोदे यांनी पोलिसांकडे तक्रार सुद्धा केली होती. मात्र काकड यांच्याकडून एक रुपया देखील मिळाला नसताना गावाकडील शेतकऱ्यांनी मात्र आमच्याकडून घेतलेल्या कापसाचे पैसे मिळावेत, यासाठी रवीप्रकाश सरोदे यांच्याकडे तगादा लावला. रवीप्रकाश सरोदे हे आपले पैसे मुद्दाम परत देत नाही, असे समजून गावातील शेतकऱ्यांनी त्यांच्या घराला चक्क कुलूप ठोकले आणि पैसे मिळाल्याशिवाय गावात येऊ देणार नाही, असा इशारा दिल्यामुळे रवीप्रकाश सरोदे हे आपल्या अपंग पत्नीसह दिवाळीच्या पूर्वीच अंजनगाव सुर्जीत आले. विशेष म्हणजे सरोदे दांपत्याकडे त्यांच्या ह्या व्यवहाराशी संबंधित कागदपत्रांच्या संदर्भात संपूर्ण पुरावे देखील (cotton merchant protest) आहेत.

अमरावती जिल्ह्यातील कापूस व्यापाऱ्याने केली आंध्र प्रदेशातील कापूस व्यापाऱ्याची फसवणूक

भाऊबीजच्या दिवसापासून ठिय्या आंदोलन : आंध्र प्रदेशात असणाऱ्या आपल्या आदोनी ह्या गावातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे आता व्याजासह परत करायचे असल्यामुळे रवीप्रकाश सरोदे यांच्याकडे विवेक काकड यांच्याकडून पैसे घेण्याशिवाय कुठलाही पर्याय नव्हता. दिवाळी पूर्वी अंजनगाव सुर्जी येथे आल्यावर हे दांपत्य काही दिवस लॉजवर राहिले. मात्र त्यांच्या जवळचे पैसे संपल्यावर त्यांनी 26 ऑक्टोबरला भाऊबीजच्या दिवशी थेट केशवनगर येथील विवेक काकड यांच्या घरासमोर येऊन ठिय्या आंदोलन सुरू केले. आपल्या घरासमोर आंदोलन सुरू झाल्यामुळे विवेक काकडे यांनी पोलिसांची मदत घेऊन सरोदे दांपत्यास घरासमोरून हकलण्याचा प्रयत्न केला. मात्र परिसरातील काही सुज्ञ नागरिकांनी पोलिसांना कायद्यानुसार चौकशी करावी, अशी विनंती केल्यावर पोलिसांनी सरोदे दांपत्यास विवेक काकड यांच्या घरासमोर आंदोलन करण्याची परवानगी दिली.

मदतीसाठी लोकं आले धावून : आपल्या घरासमोर आंदोलन सुरू झाल्यामुळे विवेक काकड हा कापूस व्यावसायिक आपले स्वतःचे घर सोडून इतर ठिकाणी राहायला पळाला. असे असले तरी सरोदे दांपत्य मात्र त्याच्या घरासमोरच ठाण मांडून आहेत. रवीप्रकाश सरोदे यांची नेमकी बाजू समजून घेतल्यावर केशवनगर परिसरातील रहिवाशांसह अंजनगाव सुर्जी येथील सुज्ञ नागरी त्यांच्या मदतीला धावून आलेत. काही जणांनी सरोदे दांपत्याला गादी आणि ब्लॅंकेटची व्यवस्था करून दिली. काही जणांनी त्यांच्यासाठी आपल्या वतीने जेवणाचा डबा देखील लावून दिला. विवेक काकड यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती असून त्यांनी या दांपत्याचा छळ करणे योग्य नाही, असे देखील अंजनगाव सुर्जी येथील अनेकांनी 'ईटीव्ही भारत ' शी बोलताना (Amravati district cotton merchant ) सांगितले.

आत्महत्येचा प्रयत्न : कडाक्याच्या थंडीत विवेक काकडच्या घरासमोर बसून देखील आपले पैसे मिळत नसल्यामुळे रवीप्रकाश सरोदे यांनी 8 नोव्हेंबरला आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांची पत्नी जया सरोदे यांनी आरडा ओरड करून शेजारच्या लोकांना बोलाविल्यामुळे काही जणांनी रवी प्रकाश सरोदे यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर त्वरित उपचार झाल्यामुळे त्यांचे प्राण बचावले. आता एक तर आम्ही आमचे पैसे घेऊन जाऊ किंवा इथेच प्राण सोडू, असे रवी प्रकाश सरोदे आपली व्यथा मांडताना 'ईटीव्ही भारत' शी बोलले.

पोटावर का मारतो लाथ : विवेक काकड याने आता काही दिवसांपूर्वी इंदोर येथील त्याची प्रॉपर्टी 12 कोटी रुपयांना विकली. त्याला नुकतेच या व्यवहारात चार कोटी रुपये मिळाले आहेत. त्याच्याकडे इतके सारे पैसे असताना त्याने आमच्या पोटावर लाथ मारू नये. मला देखील अनेकांचे देणे आहे. लोकांचे पैसे दिल्यावरच मी सुखाने दोन घास खाऊ शकतो, असे रवीप्रकाश सरोदे 'ईटीव्ही भारत ' शी बोलताना (cotton merchant) म्हणाले.

रात्र थंडीत : कडाक्याच्या थंडीत आम्ही महिनाभरापासून रात्री बाहेर झोपत आहोत. दोन दिवसांपूर्वी माझ्या पत्नीची तब्येत खराब झाली होती. तिला दवाखान्यात नेण्यात आले होते. आमच्याजवळ जगण्यासाठी आता कुठलाच पर्याय नसल्यामुळे असा दिवस रात्र या घरासमोर बसावे लागत आहे. या कडाक्याच्या थंडित सर्वसामान्य व्यक्तीचे एक रात्र काढून बघावी. खरंच फार त्रास होतो. असे देखील रवीप्रकाश सरोदे म्हणतात. विशेष म्हणजे त्यांच्या पत्नीवर उपचार करण्यासाठी अंजनगाव सुर्जी येथील डॉक्टरांनी एक पैसा देखील घेतला नाही. त्यांना औषध देखील डॉक्टरांनी उपलब्ध करून दिले.

काकडच्या घरावर बँकेची नोटीस : विवेक काकड 2018 मध्ये बँक ऑफ बडोदा च्या अचलपूर शाखेकडून घेतलेले कर्ज फेडले नसल्यामुळे या कर्जासाठी गहाण ठेवण्यात आलेले केशवनगर येथील या घरावर जप्तीची नोटीस लावण्यात आली आहे. कर्ज न फेडल्यास 23 डिसेंबरला येईल असे अचलपूर शाखेच्या बँक ऑफ बडोदाच्या वतीने अंजनगाव सुर्जी येथील तहसीलदारांनी या नोटीसमध्ये स्पष्ट केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.