अमरावती - लोकसभा मतदार संघात भाजप, शिवसेना आणि रिपाइं महायुतीचे उमेदवार म्हणून खासदार आनंदराव अडसूळ यांनी आज युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. इर्विन चौक येथे खासदार अडसूळ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन जोरदार शक्तीप्रदर्शन करत त्यांनी आज अर्ज भरला.
या मिरवणुकीत आदित्य ठाकरे विमानतळावरून थेट मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणुकीत शिवसेनेचे नेते अनिल देसाई, जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे, आमदार डॉ. सुनील देशमुख, आमदार डॉ. अनील बोंडे, आमदार रमेश बुंदीले, आमदार श्रीकांत देशपांडे, माजी खासदार अनंत गुढे, महापौर संजय नरवणे, उपमहापौर संध्या टिकले, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुनील खराटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. दिनेश सुर्यवंशी, माजी आमदार अभिजित अडसूळ, शिवसेनेचे शहर प्रमुख प्रशांत वानखडे, भाजपचे शहर अध्यक्ष जातंय डेहणक, माजी महापौर मिलिंद चिमोटे यांच्यासह भाजप आणि शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
आगामी काळात अचलपूर रेल्वेचा विकास, रेल्वे वॅगन कारखान्याची सुरुवात करू, तसेच असे अनेक विकासात्मक कामे मला येणाऱ्या काळात पूर्ण करायची आहेत, असे मत खासदार अडसूळ उमेदवारी अर्ज भरल्यावर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.