अमरावती - राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणेसह पोलीस यंत्रणेवर ताण वाढला आहे. संचारबंदीचे उल्लंघन होऊ नये. गर्दी होऊन संसर्ग वाढू नये, यासाठी शहरातील रस्त्यांवर पोलीस अहोरात्र बंदोबस्तासाठी तैनात आहेत. त्यात अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याच समोर आले. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा ताण कमी व्हावा, यासाठी अमरावती येथील पोलिसांना मेडिटेशनचे धडे देण्यात येत आहेत.
राज्यात दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी भर पडत आहे. यामुळे चिंतेंचे वातावरण आहे. त्यात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. बंदोबस्ताचा वाढता ताण कमी व्हावा, यासाठी अमरावतीतील पोलिसांना मेडिटेशनचे धडे देण्यात येत आहेत. पोलिसांना 'मेडिटेशनचे धडे' हा उपक्रम अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आला आहे.
आज सकाळी (रविवार) राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ९ मध्ये मेडिटेशनचे धडे देण्यात आले. यावेळी यशोमती ठाकूर या ही या प्रसंगी उपस्थित होत्या. या उपक्रमातून पोलिसांना मानसिक आधार व नव्याने काम करण्याची प्रेरणा मिळेल, अशी आशा ठाकूर यांनी या प्रसंगी व्यक्त केली. दरम्यान, सध्या हा प्रयोग जिल्ह्याभर राबवण्यात येणार आहे. महत्वाची बाब म्हणजे, या उपक्रमाला पोलिसांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
हेही वाचा - विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही - राज्यमंत्री बच्चू कडू
हेही वाचा - स्वत:चा जीव धोक्यात टाकून सर्प मित्राने दिले सापाला जीवनदान