अमरावती - केंद्र शासनाने आणलेल्या नवीन कृषी कायद्याला देशभरातील शेतकऱ्यांचा विरोध आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांशी चर्चा न करता तसेच कृषी तज्ज्ञांचे मत जाणून न घेता, हे कृषी कायदे आणले आहे. या नवीन कृषी कायद्याविरोधात पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश येथील शेतकरी आंदोलन करत आहे. आपल्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांना दिल्ली येऊ न देणे, ही दडपशाही आहे, असा आरोप करत मंगळवारी पुकारण्यात आलेल्या 'भारत बंद'मध्ये अमरावतीकरांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन किसान संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
अमरावतीकरांनी स्वयंस्फूर्तीने 'भारत बंद'मध्ये सहभागी व्हावे; किसान संघर्ष समितीचे आवाहन - amravati bharat band news
केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याविरोधात मंगळवारी भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या भारत बंदमध्ये अमरावतीकरांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घ्यावा, असे आवाहन किसान संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
![अमरावतीकरांनी स्वयंस्फूर्तीने 'भारत बंद'मध्ये सहभागी व्हावे; किसान संघर्ष समितीचे आवाहन amravatikars should voluntarily participate in bharat bandh appeal kisan sangharsh samiti](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9798577-651-9798577-1607355793678.jpg?imwidth=3840)