अमरावती - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. चालक आणि वाहकांचा एसटीने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांशी थेट संबंध येतो. त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण होण्याचा सर्वाधिक धोका आहे. त्यांना प्राधान्याने कोरोनाची लस देणे गरजेचे आहे. मात्र, त्यांना अद्याप लस दिलेली नाही. सर्व एसटी कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर लस द्यावी, अशी मागणी एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी केली आहे.
वाहक-चालकांनी लक्ष द्यावे -
बसस्थानकावर गर्दी होत असल्याच्या व प्रवासी मास्क वापरत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्याबाबत जिल्हाधिका-यांनी एसटीचे विभागीय नियंत्रक श्रीकांत गभणे यांच्याशी चर्चा केली. मास्क नसलेल्या प्रवाशाला बसमध्ये प्रवेश देऊ नका. आवश्यक तिथे मार्शलची मदत घ्या. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना बसस्थानकासारख्या ठिकाणी तर अधिक काटेकोरपणे कार्यवाही होणे गरजेचे आहे. त्यामुळे स्वत: लक्ष घालून वाहक-चालकांनी प्रवाशांना नियम पाळण्याच्या सूचना द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले होते. त्यामुळे आपले नियमित काम सांभाळून चालक-वाहकांना प्रवाशांवर देखील लक्ष ठेवावे लागत आहे.
हेही वाचा - कोरोना अपडेट : गेल्या २४ तासांमध्ये देशात १ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद; ४७८ बळी