ETV Bharat / state

अमरावतीत शिवमहापुराण कथेसाठी भाविकांची गर्दी; एसटी महामंडळ झालं मालामाल

Amravati Shiv Mahapuran Katha : अमरावती शहरालगत असणाऱ्या मालखेड जंगल परिसरात 16 ते 20 डिसेंबर दरम्यान कथाकार प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी 15 ते 20 लाख लोकांनी गर्दी केली. या गर्दीचा फायदा एस टी महामंडळाला झाला असून महामंडळ मालामाल झालं आहे.

st corporation benefited from the shiv mahapuran katha held in amravati
अमरावतीत शिवमहापुराण कथेसाठी प्रवाशांनी केली गर्दी; एसटी महामंडळ झाले मालामालharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 22, 2023, 10:52 AM IST

अमरावती Amravati Shiv Mahapuran Katha : अमरावती जिल्हा सहलगतच्या सर्व जिल्ह्यातून प्रदीप मिश्रा यांची शिवमहापुराण कथा ऐकण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाच्या वतीनं जास्त गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. तसंच रोज 120 एसटी बस शिवमहापुराण कथेच्या निमित्तानं प्रवाशांच्या सुविधेसाठी धावत होत्या. अशा 14 तालुक्यांमध्ये रोज 40 ते 42 गाड्या धावल्या. एकूणच शिवमहापुराण कथेच्या पाच दिवसात एसटी महामंडळाला 20 ते 22 लाख रुपयांचं उत्पन्न मिळाल्याची माहिती एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक निलेश बेलसरे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

कथा संपल्यावर बस स्थानकावर प्रचंड गर्दी : 16 ते 20 डिसेंबर दरम्यान शिवमहापुराण कथा ऐकण्यासाठी अमरावती जिल्ह्यासह लगतच्या सर्व जिल्ह्यातून हजारो लोक एसटी बसद्वारे अमरावतीला आले. 20 डिसेंबरला सकाळी 11 वाजता कथा समाप्तीनंतर दुपारी दोन वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत अमरावती मध्यवर्ती बस स्थानकासह राजापेठ बस स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली होती. विशेष म्हणजे बस स्थानकावरील गर्दी आवरण्यासाठी महामंडळाच्या खासगी सुरक्षा रक्षकांसह पोलिसांना देखील धावून यावं लागलं.

अखेरच्या दिवशी 90 गाड्यांची भर : अमरावती मध्यवर्ती बस स्थानकासह राजापेठ बस स्थानकावर बुधवारी (20 डिसेंबर) प्रचंड गर्दी बघायला मिळाली. यावेळी बस संख्या अपुरी न पडावी, यासाठी नेहमीपेक्षा अतिरिक्त 90 गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती, असं निलेश बेलसरे यांनी सांगितलं. तसंच शेवटच्या दिवशी यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यातून प्रत्येकी 15 गाड्या आणि वर्धा जिल्ह्यातून 10 अशा चाळीस गाड्या बोलवण्यात आल्या. तर अमरावतीतून अतिरिक्त 40 ते 50 गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. प्रवाशांची गैरसोय होणार नाही, यासाठी एसटी महामंडळाच्या सर्व चालक, वाहक आणि कर्मचाऱ्यांनी योग्य नियोजन आखलं. त्यामुळं कुठंही गोंधळ झाला नाही, असंही निलेश बेलसरे म्हणाले.

हेही वाचा -

  1. कधी वाघ आला नाही, अस्वलाचीही भीती वाटली नाही; मेळघाटच्या जंगलात बकऱ्या चारणाऱ्या दृष्टिहीन दांपत्याची खास कहाणी
  2. एकच कुटुंब असणारे गाव! मेळघाटातील घनदाट जंगलात पिली गावात एकच घर, पाहा व्हिडिओ
  3. ॲडमिशन मराठीला अन् हॉल तिकीट एम.ए. इंग्रजी आणि मराठीचे; संत गाडगेबाबा विद्यापीठाचा प्रताप

अमरावतीत शिवमहापुराण कथेसाठी प्रवाशांनी केली गर्दी; एसटी महामंडळ झाले मालामाल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.