ETV Bharat / state

अमरावतीत पोलीस उपनिरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या; दोन दिवसाअगोदरची फेसबुक पोस्ट ठरली शेवटची - पोलीस उपनिरीक्षक अनिल मुळे

आपलं फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची दोन दिवसांपूर्वी फेसबुक पोस्ट करणाऱ्या अमरावती शहर पोलीस विभागातील पोलीस उपनिरीक्षक अनिल मुळे यांनी आज दुपारी अमरावतीनजीक असलेल्या रहाटगावं शेतशिवारात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.

पोलीस उपनिरीक्षक अनिल मुळे
पोलीस उपनिरीक्षक अनिल मुळे
author img

By

Published : Aug 13, 2021, 10:35 PM IST

Updated : Aug 13, 2021, 10:49 PM IST

अमरावती - आपलं फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची दोन दिवसांपूर्वी फेसबुक पोस्ट करणाऱ्या अमरावती शहर पोलीस विभागातील पोलीस उपनिरीक्षक अनिल मुळे यांनी आज दुपारी अमरावतीनजीक असलेल्या रहाटगावं शेतशिवारात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.

पोलीस उपनिरीक्षक अनिल मुळे
पोलीस उपनिरीक्षक अनिल मुळे

अनिल मुळे यांची नेमणूक फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन येथे करण्यात आली होती. काही दिवस नोकरी करुन ते गेल्या चार महिन्यापासून ड्युटीवर गैरहजर होते. यापूर्वी त्यांनी गाडगेनगर डीबी स्कॉड उत्तमरित्या हाताळले. त्यांनी अचानक रहाटगाव शेतशिवारात जाऊन झाडाला गळफास घेऊन आत्महत्या का केली याचा उलगडा मात्र होऊ शकला नाही. नांदगाव पेठ पोलिसांना माहिती होताच त्याठिकाणी जाऊन पंचनामा करण्यात आला. मृत्यूची माहिती नातेवाईकांना देऊन शवविच्छेदनकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली याचा तपास नांदगाव पेठ पोलीस करीत आहे.

दोन दिवसाअगोदर फेसबुकवर लिहिली पोस्ट
दोन दिवसाअगोदर फेसबुकवर लिहिली पोस्ट

काय होत अखेरच्या पोस्टमध्ये -

नमस्कार मित्रांनो, माझ्या सर्व मित्रांना विनंती आहे की, कोणीतरी माझ्या नावाने फेक फेसबुक आयडी काढली आहे. आणि तो लोकांना माझ्या नावावर पैसे मागत आहे. कृपया सर्वांनी त्या फेक आयडीला रिपोर्ट करावे
आणि कोणीही पैशाचा व्यवहार करू नये. आपलाच पीएसआय अनिल मुळे...

Last Updated : Aug 13, 2021, 10:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.