अमरावती - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या वरुड तालुक्यात शनिवारी एकाच दिवशी तब्बल 204 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. शनिवारी जिल्ह्यात आढळलेल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी 21 टक्के कोरोना रुग्ण हे एकट्या वरुड तालुक्यातील आहेत. तर जिल्ह्यात काल 980 रुग्णांची नोंद झाली असून, आतापर्यंत एकूण 966 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
वरुड तालुक्यात आढळलेले कोरोना रुग्ण
वरुड 70, जरूड 08, टेंभूखेडा 10, शेंदूरजनाघाट12, बेनोडा शाहिद 10, पुसला 06, सुरली 05, राजुरा बाजार 3, अमडापुर 5, ढगा 4, मोरचुंद 4, वाठोडा 3, लिंगा 3, वंडली 2, बेसरखेडा 1, मांगरुळी 3, सावंगी 8, लोणी 3, शिरपूर 2, चिंचरगव्हाण 3, घोराड 2, आमनेर 1, तिवसाघाट 3, वाईखुर्द 1, गाडेगाव 1, एक्दरा 1, कुरली 1, धानोडी 1, वाडेगाव 1, सातनूर 3, शिंगोरी 1, उमरी 1, गव्हांकुंड 1, जामगाव खडका 1, देउतवाडा 3, पवनी 1, कराजगाव 3, कचुरणा 1, आलोडा 2, मागझिरी 2, हतुरणा 2, जामगाव 2, इसंब्री 2 आणि पडसोना गावात 1 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.
हेही वाचा - 'आम्हाला 2 हजार 280 मतदारांची साथ; गोकुळ व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्याच्या हातात जाईल'