ETV Bharat / state

'मुख्यमंत्री जागे व्हा, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा' - milk rate news

भाजपा व महायुती तर्फे आधी मुख्यमंत्री व सर्व मंत्र्यांना दूध पाठविले. दुसऱ्या टप्यात दुधाचे संकलन बंद केले. आज पासून आंदोलनाचा तिसरा टप्पा चालू झाला आहे

दूध दर आंदोलन
दूध दर आंदोलन
author img

By

Published : Aug 13, 2020, 7:59 PM IST

अमरावती - राज्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न खूप पेटला आहे. दुधाला 30 रु. भाव, 10 रु. अनुदान व दुधाच्या भुकटीला 50 रु. अनुदान च्या मागण्यांसाठी भाजप व युती पक्षातर्फे दूध आंदोलनाला सुरुवात झाली. 13 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट दरम्यान तिसरे आंदोलन होत आहे. या आंदोलनमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातूून 5 लाख पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहणार आहे. त्याची सुरुवात माजी कृषिमंत्री व भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांनी आपल्या कार्यकर्ते व शेतकऱ्यांसोबत अंबाडा ता. मोर्शी येथून केली.

भाजपा सरकारच्या काळातसुद्धा असाच प्रश्न उपस्थित झाला होता. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रश्न त्यांच्या मागण्या पूर्ण करून मार्गी लावला होता. परंतु या कोरोनाच्या लॉकडाउनमध्ये दुधाचे पदार्थ, चहा कॅन्टीन बंद असल्याने दुधाचे भाव पडले व या संकटाच्या काळात सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला हवे होते. परंतु सरकार शेतकऱ्यांची कोणतेही मागणी पूर्ण करताना दिसत नाही, असे डॉ. बोंडें म्हणाले.

भाजपा व महायुती तर्फे आधी मुख्यमंत्री व सर्व मंत्र्यांना दूध पाठविले. दुसऱ्या टप्यात दुधाचे संकलन बंद केले. आज पासून आंदोलनाचा तिसरा टप्पा चालू झाला आहे.

अमरावतीमध्ये माजी कृषिमंत्री व भाजपा किसान मोर्चाचे अध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांनी अंबाडा येथे गाईच्या गोठ्यातूून गाईचे पूजन, आरती ओवाळून शेतकरी व कार्यकर्ते समवेत गोठ्यातून मुख्यमंत्री यांना पत्र लिहिलेे. यावेेली मुख्यमंत्री जागे व्हा, शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा, अशा घोषणा ही देण्यात आल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.