ETV Bharat / state

पक्षी सप्ताह : वडाळी जंगलात पक्षी निरीक्षकांची भ्रमंती सुरू - महाराष्ट्र पक्षी सप्ताह कार्यक्रम

5 नोव्हेंबरपासून १२ नोव्हेंबरपर्यंत राज्यात पक्षी सप्ताहाचे आयोजन करण्यास शासकीय स्तरावर मान्यता द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना करत होती. त्यांच्या या मागणीला राज्य शासनाने हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे यावर्षीपासून 5 नोव्हेंबरपासून १२ नोव्हेंबरपर्यंत पक्षी सप्ताह साजरा होत आहे.

Birds
पक्षी
author img

By

Published : Nov 5, 2020, 1:53 PM IST

अमरावती - महाराष्ट्र्रात यावर्षी 5 नोव्हेंबरपासून १२ नोव्हेंबरपर्यंत पक्षी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. वन्यजीव संरक्षक आणि पक्षी निरीक्षक मारुती चितमपल्ली यांचा 5 नोव्हेंबरला वाढदिवस असतो, तर बर्डमॅन ऑफ इंडिया डॉ. सलीम अली यांची 12 नोव्हेंबरला जयंती असते. याचे औचित्य साधून या पक्षी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. अमरावतीच्या वडाळी येथील बांबू गार्डन परिसरात उपवनसंरक्षक चंद्रशेखरन बाला यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे प्रमुख डॉ. जयंत वडतकर यांच्याहस्ते पक्षी निरीक्षण उपक्रमाचे उद्घाटन झाले.

अमरावतीमध्ये पक्षी सप्ताहाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली

वडाळीच्या जंगलात विविध पक्षांचा किलबिलाट -

अमरावती शहराला लागूनच असणाऱ्या वडाळी जंगलात वडाळी तलाव, फुटका तलाव आणि भवानी तलाव आहे. पानवठयांनी समृद्ध असणाऱ्या या परिसरात गुज, गडवाल या स्थलांतरित पक्षांसह करकोचा, पोपट, बदक, तलवार बदक, जांभळ्या पान कोंबडया, तुतारी, जकाणा, धोबी, चक्रवाक, धिवर, टिटवी, आरली, पणचिरा, कुरव, पाण्यात टिबुकली, सुरच,शराटी, तपस असे विविध पक्षी आहेत. थंडीमुळे अनुकूल वातावरण तयार झाल्याने जंगलात आता पक्षांचा किलबिलाट वाढला आहे.

थंडीमुळे स्थलांतरित पक्षांची सांख्य आणखी वाढणार -

थंडी वाढली की वडाळी जंगलात देश-विदेशातील स्थलांतरित पक्षांची संख्या दरवर्षी वाढते. यावर्षी मुबलक प्रमाणात पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात पक्षी येण्याची शक्यता आहे, अशी माहिती महाराष्ट्र पक्षी निरीक्षक संघटनेचे प्रमुख डॉ. जयंत वडतकर यांनी दिली.

आठवडाभर चालणार विविध कार्यक्रम -

पक्षी सप्ताह निमित्ताने संपूर्ण आठवडाभर विविध कार्यक्रम राबवले जाणार आहेत. पक्षी विषयावर चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा यासह छायाचित्र स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र पक्षीमित्र संघटने केले आहे.

उद्घाटन सोहळ्याला यांची होती उपस्थिती -

पक्षी निरीक्षण उपक्रमाच्या उद्घाटनाला उपवनसंरक्षक चांदरशेखरन बाला, ज्योती पवार, लीना आडे, वडाळी वनपरीक्षेत्र अधिकारी कैलास भुम्बर, महाराष्ट पक्षीमित्र संघटनेचे पदाधिकारी यादव तरते, डॉ. गजानन वाघ, यांच्यासह चांदुर रेल्वेचे उपविभागीय अधीकारी इब्राहिम चौधरी, सतेच केचे आदी सहभागी होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.