ETV Bharat / state

Amravati violence : अमरावतीत कलम 144 लागू, इंटरनेट सेवा केली बंद

अमरावतीत बंददरम्यान शनिवारी एका समाजाच्या काही तरुणांनी जाळपोळ केली. त्याच्या निषेधार्थ दुसऱ्या समाजाच्या काही संघटनांनी आज अमरावती बंद पुकारला होता. त्यामुळे आज शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी याची माहिती दिली. तसेच त्यांनी शांतता राखण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. दरम्यान, पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

अमरावतीत हिंसक वळण
अमरावतीत हिंसक वळण
author img

By

Published : Nov 13, 2021, 11:02 AM IST

Updated : Nov 13, 2021, 4:01 PM IST

अमरावती - अमरावतीत बंददरम्यान शनिवारी झालेल्या हिंसाचारानंतर शहरात पुढील ४ दिवस कलम 144 लागू करण्यात आले आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर (yashomati thakur) यांनी याची माहिती दिली. तसेच इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अपवा पसरण्याची भीती असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ अमरावतीत (Amravati violence) शुक्रवारी काढलेल्या मोर्चा दरम्यान काही दुकानांची तोडफोड झाली. याच्या निषेधार्थ आज अमरावतीत बंद पुकारण्यात आला असून या बंदलाही हिंसक वळण लागल्याचे चित्र शनिवारी बघायला मिळाले. दरम्यान, पोलिसांकडून (Maharashtra police) परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

बंददरम्यान शहरातील रस्त्यांवर उतरलेल्या जमावाकडून काही ठिकाणी तोडफोड करण्यात आल्याचे चित्र बघायला मिळाले. यावेळी जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी काही ठिकाणी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. दरम्यान, या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

अमरावतीत हिंसक वळण
अमरावतीत हिंसक वळण

सध्या पोलीस परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करित आहेत. अनेक ठिकाणी पोलिसांनी (Maharashtra Police) बळाचा वापर करून हिंसक जमावाला हुसकावून लावले आहे. दरम्यान, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (dilip walse patil), गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई (shambhuraj desai), अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर (yashomati thakur), अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी नागरिकांना शांतता पाळण्याचे आवाहन केले आहे.

अमरावतीत हिंसक वळण
अमरावतीत हिंसक वळण

पालकमंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या..

कालच्या घटनेवर अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर (yashomati thakur) यांनी जनतेला शांततेच आवाहन केलं आहे. तसेच कोणीही सामान्य जनतेला वेठीस धरू नये, घटनेची सखोल चौकशी होईल, कोणीही राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करू नये, सर्वांना शांतता राखावी असं आवाहन पालकमंत्री व महिला, बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (yashomati thakur) यांनी केलं आहे.

गृहमंत्री म्हणाले...

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्यातील जनतेला शांतता व संयम राखण्याचे आवाहन केले आहे. राज्य सरकार पूर्णपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. संयम बाळगावा असे कळकळीचे आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी केले आहे.

भाजपचा अमरावती बंद

त्रिपुरा येथील घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी अमरावती (Amravati violence) शहरात मोर्चा काढला असता या मोर्चाला हिंसेचे गालबोट लागले. या संपूर्ण प्रकारामुळे अमरावती शहरात (Amravati violence) दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टीच्या (BJP agitation) वतीने अमरावती बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला शहरातील व्यापाऱ्यांनी ही पाठिंबा दिला असून शहरातील बाजारपेठ आज बंद आहे. राजकमल चौक येथे भाजप कार्यकर्त्यांच्या (BJP agitation) वतीने पाकिस्तानच्या (Pakistan) विरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे. पोलिसांचा तगडा बंदोबस्त राजकमल चौकात लावण्यात आला असून राजकमल चौक ते जयस्तंभ चौक परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे.

कारवाई केली जाईल -नवाब मलिक

ज्या संघटनांनी बंदचा आवाहन लोकांना केलं होत. त्या संघटनेची जबाबदारी होती की, हे आंदोलन शांततेत पार पडावं. एखाद्या घटनेचा निषेध करणे हा लोकांचा अधिकार आहे. मात्र, आंदोलन करत असताना त्या आंदोलनावर संपूर्ण नियंत्रण असणे गरजेचे आहे. ज्या संघटनांकडून आंदोलन पुकारण्यात आलं. त्यांच्याकडून आंदोलनाबाबतचे नियोजन होणे गरजेच असतं. आंदोलनातून हिंसा होणार नाही, याची दक्षता आयोजकांनी घेणे आवश्यक आहे. मात्र, अमरावती, नांदेड आणि मालेगावमध्ये घडलेली घटना योग्य नसून या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्या लोकांवर राज्य सरकार कारवाई करेल, असा इशारा राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिला आहे.

राज्य सरकारने त्वरीत कारवाई करावी -दरेकर

अमरावतीमध्ये (Amravati violence) आज बंद दरम्यान घडलेल्या हिंसाचारावर विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, त्रिपूरात (tripura violence) घडलेल्या घटनेचा उद्रेक राज्यात होता कामा नये. ज्यांनी हिंसाचार घडवून आणली त्यांच्यावर राज्य सरकारने त्वरीत कारवाई करावी. जातीय तणाव महाराष्ट्रासाठी योग्य नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

हे भाजपचे अपयश - असदुद्दीन ओवैसी यांची टीका

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी त्रिपुरा हिंसाचारावरून (Tripura violence) भाजपा सरकारवर टीका केली. त्रिपुरामध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. भाजपाच्या अपयशामुळे दंगलखोरांनी मशिदींवर हल्ले केले. त्रिपुरा सरकारने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असे ते म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून त्रिपुरामध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. उत्तर त्रिपुरा जिल्ह्यात दोन ते तीन हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला होता. त्यामध्ये मोर्चेकऱ्यांनी मशिदीचं नुकसान केलं होतं.

Last Updated : Nov 13, 2021, 4:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.