ETV Bharat / state

अमरावतीच्या इटकी ग्रामस्थांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

इटकी गावात मूलभूत सुविधा नसल्याचा आरोप करत नागरिकांनी याबाबत दर्यापूर तहसीलदारांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. गावातील आजारी व्यक्तीला रुग्णालयात नेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. तर शाळकरी विद्यार्थ्यांचे सुद्धा यादरम्यान शैक्षणिक नुकसान होते.

तहसीलदारांना निवेदन देताना ग्रामस्थ
author img

By

Published : Mar 27, 2019, 2:58 PM IST

Updated : Mar 27, 2019, 3:24 PM IST

अमरावती - दर्यापूर तालुक्याच्या इटकी गावातील नागरिकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. गावात मूलभूत सुविधा नसल्याचा आरोप करत नागरिकांनी याबाबत दर्यापूर तहसीलदारांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.

ग्रामस्थ

इटकी गावाजवळील गणेश नाला व मासोळी नाला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाल्यावरील पूल जमीनदोस्त झाला आहे. त्यामुळे पावसाळ्यात इटकीपासून दर्यापूर अंजनगाव रोडला जोडणाऱ्या रस्त्यावरुन प्रवास करणे ग्रामस्थांना कठीण जाते. या गावातील नाल्याला पावसाळ्यात पूर आल्यास गावाकऱ्यांचा तालुक्याशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटतो. गावातील आजारी व्यक्तीला रुग्णालयात नेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. तर शाळकरी विद्यार्थ्यांचे सुद्धा यादरम्यान शैक्षणिक नुकसान होते. या दोन्ही पुलाचे काम करण्यासाठी तसेच सांगळुद ते इटकी रस्त्याचे खडीकरण व गावातील स्मशान भूमीचा रस्ता तयार करून देण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत गावकऱ्यांनी अनेक वेळी तोंडी व लेखी निवेदने दिली. तरीही इटकीतील ग्रामस्थांच्या समस्यांचे निराकरण झाले नाही.

लोकप्रतिनिधींनी सुद्धा गावाच्या या ज्वलंत समस्येवर लक्ष दिले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी निवेदनातून केला आहे. भौतिक व मुलभूत सुविधापासून रहिवासी वंचित असल्याची भावना व्यक्त करीत लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून गावकऱ्यांनी दिला आहे .

Intro:अमरावतीच्या इटकी गावातील ग्रामस्थांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

(मूलभूत सुविधापासून वंचित असल्याचे आरोप)

अँकर
अमरावती जिल्ह्यातील
दर्यापूर तालुक्यातील इटकी गावालगत असलेल्या गणेश नाला व मासोळी नाला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाल्यावरील गेल्या तीस वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले पूल सद्यस्थितीत पूर्णता जमीनदोस्त झाल्याने पावसाळ्यात इटकी पासून दर्यापूर अंजनगाव रोडला जोडणाऱ्या रस्त्यावरून प्रवास करणे ग्रामस्थांना अतिशय कठीण जात असून विवध समस्यांनी ग्रासलेल्या ग्रामस्थानी थेट लोकसभा निवडणूकी वरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

Vo-1

या गावातील नाल्याला पावसाळ्यात पूर आल्यास गावाकर्याचा तालुक्याशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटतो. गावातील आजारी व्यक्तीला दवाखान्यात नेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते तर शाळकरी विद्यार्थ्यांचे सुद्धा यादरम्यान शैक्षणिक नुकसान होते. या दोन्ही पुलाचे काम करण्यासाठी तसेच सांगळुद ते इटकी रस्त्याचे खडीकरण व गावातील स्मशान भूमीचा रस्ता तयार करून देण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत गावकऱ्यांनी अनेक वेळी तोंडी व लेखी निवेदने देऊन सुद्धा इटकी गावच्या ग्रामस्थांच्या समस्यांचे निराकरण झाले नाही.

बाईट-1 नागरिक

Vo-2

लोकप्रतिनिधींनी सुद्धा गावाच्या या ज्वलंत समस्येवर लक्ष दिले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी निवेदनातून केला असून भौतिक व मुलभूत सुविधा पासून रहिवासी वंचित असल्याची भावना व्यक्त करीत लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून गावकर्यानी दिला आहे .

गावातील इतरही मूलभूत सुविधांपासून गावकरी वंचित आहेत. यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गावकऱ्यांनी सभा घेऊन आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.Body:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : Mar 27, 2019, 3:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.