ETV Bharat / state

अमरावतीतून दीड वर्षात उडणार विमान; आमदार देशमुखांच्या प्रयत्नांना यश - बेलोरा

आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी अमरावतीतून प्रवासी विमान उडण्यासाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांना आता यश आले आहे. 39 कोटी 33 लाख रुपये खर्चून अमरावती विमानतळाचा विकास होणार आहे.

विमानतळ
author img

By

Published : Apr 27, 2019, 8:16 PM IST

अमरावती - येत्या दीड वर्षात अमरावतीतून प्रवासी विमान उडण्याची चिन्ह आता दिसत आहेत. आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी अमरावतीतून प्रवासी विमान उडण्यासाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांना आता यश आले आहे. 39 कोटी 33 लाख रुपये खर्चून अमरावती विमानतळाचा विकास होणार असून येत्या दीड वर्षात अमरावतीतून प्रवासी विमान हवेत झेपावणार आहे.

विमानतळ

अमरावतीच्या बेलोरा विमानतळावरून नियमित विमानसेवा सुरू होण्यासाठी धावपट्टीचा विस्तार होणे गरजेचे आहे. सध्या अमरावती विमानतळाची धावपट्टी ही केवळ 1371 मिटर आहे. या धावपट्टीवर केवळ 5 आसनी विमान उतरू शकते. प्रवासी विमानासाठी 1800 मिटरच्या धावपट्टीची गरज आहे.

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीद्वारे अमरावती विमानतळाच्या प्रस्तावित विकासकामांच्या निर्मितीसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. 29 एप्रिलला कागदपत्रांचे अंतिम सादरीकरण व बीड सबमिशन केल्यानंतर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या मुंबई येथील कार्यालयात 30 एप्रिलला निविदा उघडल्या जाणार आहेत. त्यानंतर नियमानुसार प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

राईट्स कंपनीने विमानतळ विस्तारीकरणाचा मुख्य टप्पा असलेल्या ओएलएस सर्वेक्षण, टर्मिनन्स बिल्डिंग, एटीएस टॉवर उभारणीचा नकाशा तयार करून दिला आहे. धावपट्टीवरून जाणाऱ्या उच्च दाबाच्या तारा काढण्यात आल्या आहेत. यवतमाळ मार्गापर्यंतची जमीन धावपट्टी विस्तारासाठी घेण्यात आली आहे. सध्या विमानतळाच्या हद्दीतील जागेवर भिंत उभारण्यात येत आहे. मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, औरंगाबाद या महसुली मुख्यालयाच्या ठिकाणी विमानतळ असताना अमरावती या महसुली केंद्र असणाऱ्या शहरात विमानतळ नसणे, ही लाजिरवाणी बाब होती. आता मात्र वर्ष-दीड वर्षात अमरावती विमानतळावरूनही प्रवासी विमान उडायला लागतील, असे आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

Intro:येत्या दीड वर्षात अमरावतीतून प्रवासी विमान उडण्याची चिन्ह आता दिसताहेत. राज्यातील सहा महसुली मुख्यल्यांपैकी एक असणाऱ्या अमरावती शराहात विमानसेवा नसणे हे दुर्दैव होते. आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी अमरावतीतून प्रवासी विमान उडण्यासाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांना आता यश आले असून ३९ कोटी ३३ लाख रुपये खर्चून अमरावती विमानतळाचा विकास होणार असून येत्या दीड वर्षात अमरावतीतून प्रवासी विमान हवेत झेपावणार आहे.

Body:अमरावतीच्या बेलोर विमानतळावरून नियमित विमानसेवा सुरू होण्यासाठी धावपट्टीचा विस्तार होणे अत्यंत गरजेचे आहे. सध्या अमरावती विमानतळाची धावपट्टी ही केवळ १३७१ मिटर इतकी आहे. या धावपट्टीवर केवळ ५ आसनी विमान उतरू शकते. प्रवासी विमानासाठी १८०० मिटरच्या धावपट्टीची गरज आहे.
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीद्वारे अमरावती विमानतळाच्या प्रस्तावित विलास कामांच्या निर्मितीसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. २९ एप्रिलला कागदपत्रांचे अंतिम सादरीकरण व बीड सबमिशन केल्यानंतर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या मुंबई येथील कार्यालयात ३० एप्रिलला निविदा उघडल्या जाणार आहेत. त्यानंतर नियमानुसार प्रत्यक्ष कमला सुरुवात होणार आहे.
दरम्यान राईट्स कंपनीने विमानतळ विस्तारीकरिकरणाचा मुख्य टप्पा असलेल्या ओएलएस सर्वेक्षण, टर्मिनन्स बिल्डिंग, एटीएस टावर उभारणीचा नकाशा तयार करून दिला आहे. धावपट्टीवरून जाणारे उच्च दाबाच्या तारा काढण्यात आल्या आहे. यवतमाळ मार्गपर्यंतची जमीन धावपट्टी विस्तारासाठी घेण्यात आली आहे. सध्या विमानतळाच्या हद्दीतील जागेवर भव्य भिंत उभारण्यात येत आहे. मुंबई, नागपूर, नाशिक ,पुणे , औरंगाबाद या महसुली मुख्यलायच्या ठिकाणी विमानतळ असताना अमरावती या महसुली केंद्र असणाऱ्या शहरात विमानतळ नसणे ही लाजिरवाणी बाब होती. आता मात्र वर्ष- दीड वर्षात अमरावती विमानतालावरूनही प्रवासी विमान उडायला लागतील असे आमदार डॉ. सुनील देशमुख 'ईटीव्ही भारत' शी बोलताना म्हणाले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.