ETV Bharat / state

अमरावतीच्या 'या' तरुण अभियंत्याने बनवले शेण उचलण्याचे मशीन

अमरावती येथील प्रोफेसर राम मेघे इंस्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च या अभियांत्रिक महाविद्यालयातील मेकॅनिकल शाखेतून प्रज्वल चव्हाण याने अभियांत्रिकीचे शिक्षण पुर्ण केले आहे. मात्र, घरचा मुख्य धंदा शेती असल्यामुळे शेण उचलण्याची मशीन आपण बनवावी असा निर्धार त्याने केला होता. सतत अनेक वर्षे प्रज्वलने यावर संशोधन केले. अभियांत्रिकीचे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर जास्त वेळ तो या मशिनसाठी देत होता. काही दिवसांपुर्वी प्रज्वलला हे मशीन बनवण्यात यश आले.

अमरावतीच्या 'या' तरुण अभियंत्याने बनवले शेण उचलण्याचे मशीन
author img

By

Published : Jun 5, 2019, 7:26 PM IST

अमरावती - महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात मोठ्या जनावरांची संख्या अधिक आहे. खेड्यात कुठेही गेले असता, रस्त्यावर शेणाचे ढिगारे नक्कीच पाहायला मिळतात. हीच परस्थिती लक्षात घेऊन अमरावती येथील एका तरुण अभियंत्याने चक्क शेण उचलण्याचे मशीन बनवले आहे. हे महाराष्ट्रातील अशा पद्धतीचे पहिलेच मशीन असल्याची माहिती मिळत आहे. प्रज्वल चव्हाण असे त्या अभियंत्याचे नाव आहे.

अमरावतीच्या 'या' तरुण अभियंत्याने बनवले शेण उचलण्याचे मशीन

प्रज्वल चव्हाण यांने अमरावती शहरातील प्रो. राम मेघे इंस्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च या अभियांत्रिक महाविद्यालयातून मेकॅनिकल शाखेचे शिक्षण पुर्ण केले आहे. दरम्यान, घरचा मुख्य धंदा शेती असल्यामुळे शेण उचलण्याची मशीन आपण बनवावी असा निर्धार त्याने केला होता. सतत अनेक वर्षे प्रज्वलने यावर संशोधन केले. पुढे अभियांत्रिकीचे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्याने त्याचा संपूर्ण वेळ या मशीनच्या निर्मितीसाठी दिला. काही दिवसांपुर्वीच प्रज्वलला हे मशीन बनवण्यात यश आले.

प्रज्वलने तयार केलेले मशीन यशस्वीरित्या शेण उचलते. यामुळे आता शेण उचलण्यासाठी हाताची आवश्यकता भासनार नाही. या मशीनमुळे आता शेण उचलणे अगदी सोपे झाले आहे. "सेमी ऑटोमॅटिक'' शेण उचलण्याच्या मशीनचे फक्त बटण दाबल्यास मशीन सेकंदात शेण गोळा करते. शेण उचलणे, साठवणे, फेकणे ही सुध्दा कामे या मशीनमुळे शक्य झाली आहेत. त्याला स्टार्टअप इंडियाची मान्यता सुध्दा मिळाली आहे. केवळ २४ वर्षाच्या मराठमोळ्या विद्यार्थ्याने चक्क स्वत: मशीन बनवल्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. यासाठी त्याला अक्षय वाघ या विद्यार्थ्याने काही प्रमाणात मदत केली आहे. हे मशीन पाहण्यासाठी अनेक जण आता प्रज्वल चव्हाणची भेट घेत आहेत.

Intro:अभियांत्रीकी पुर्ण केलेल्या विद्यार्थ्याने बनविली शेण उचलण्याची मशीन ,अमरावतीच्या विद्यार्थ्यांचा प्रयोग

महाराष्ट्रातील पहिलीच मशीन

*अमरावती - एंकर*

महाराष्ट्रातील ग्रामिण भागात मोठ्या जनावरांची संख्या अधिक आहे. खेड्यात कुठेही गेले असता रस्त्यावर शेणाचे ढिगारे नक्कीच आढळतात. हीच परिस्थिती लक्षात घेऊन अमरावती येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयातुन मेकॅनिकल शाखेचा अभ्यासक्रम पुर्ण केलेल्या २४ वर्षीय विद्यार्थ्याने चक्क स्वत:च शोध लावुन हात न लावता शेण उचलण्याची मशीन बनविली आहे. सदर मशीन महाराष्ट्रातील प्रथमच असल्याचे समजते.

*VO-*

अमरावती येथील प्रोफेसर राम मेघे इंस्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च या अभियांत्रिक महाविद्यालयातील मेकॅनिकल शाखेतुन प्रज्वल चव्हाण याने अभियांत्रिकीचे शिक्षण पुर्ण केले. परंतु शिक्षण सुरू असतांनाच व घरचा मुख्य धंदा शेतकरी असल्यामुळे शेण उचलण्याची मशीन आपण बनवावी असा निर्धार त्याने केला होता. सतत अनेक वर्षे प्रज्वलने यावर शोध केले. अभियांत्रिक पुर्ण झाल्यानंतर अजुन जास्त वेळ तो या मशिनसाठी देत होता. अन शेवटी काही दिवसांपुर्वी प्रज्वल ला यश आले. त्याने ही मशीन पुर्ण तयार केली असुन याने यशस्वीरित्या शेण उचलल्या जात आहे. त्यामुळे शेण उचलण्यासाठी हाताची आवश्यकता पडणार आहे. त्यामुळे आता शेण उचलणे अगजी सोपे झाले असुन "सेमी ऑटोमॅटिक शेण उचलण्याच्या मशीनचे फक्त बटण दाबल्यास सेकंदात शेण गोळा करते. तसेच शेण उचलणे, साठवणे, फेकणे तेही हात न भरवता ही या मशीनमुळे शक्य झाले आहे. त्याला स्टार्टअप इंडिया मान्यता सुध्दा मिळाली आहे. केवळ २४ वर्षीय मराठमोळ्या विद्यार्थ्याने चक्क स्वत: मशीन बनविल्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. यासाठी त्याला अक्षय वाघ या विद्यार्थ्याने काही प्रमाणात मदत केली आहे. तसेच ही मशीन पाहण्यासाठी अनेक जण आता प्रज्वल चव्हाण ची भेट घेत आहे.

(बाईट - प्रज्वल चव्हाण)Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.