ETV Bharat / state

Farmer Women Murder मेळघाटात शेतकरी महिलेची बलात्कारानंतर हत्या; आरोपीला अटक - शेतकरी महिलेवर बलात्कार करत हत्या

शेताच्या बांधावर बैल चारण्याच्या वादातून शेतकरी महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली आहे. धारणी तालुक्यातील बिरोटी या Rape and murder woman in Biroti village Dharni गावात बुधवारी सायंकाळी ७ च्या सुमारास ही अश्लील घटना घडली. याप्रकरणी मृताच्या पतीच्या तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आली असून, धारणी पोलिसांनी खून व बलात्काराच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला. सचिन उर्फ रम्मू शिवलाल दारसिंभे २६ असे आरोपीचे नाव आहे.

Farmer Women Murder
Farmer Women Murder
author img

By

Published : Sep 1, 2022, 6:43 PM IST

अमरावती - शेतीच्या बांधावर बैल चारण्यातून झालेल्या वादात एका महिलेवर बलात्कार करण्यात आला. यानंतर आरोपीने दगडाने ठेचून तिची हत्या केली. या घटनेमुळे मेळघाटात खळबळ उडाली आहे. धारणी तालुक्यातील बिरोटी या Rape and murder woman in Biroti village Dharni गावात बुधवारी सायंकाळी ७ च्या सुमारास ही अश्लील घटना घडली. याप्रकरणी मृताच्या पतीच्या तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आली असून, धारणी पोलिसांनी खून व बलात्काराच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला. सचिन उर्फ रम्मू शिवलाल दारसिंभे २६ असे आरोपीचे नाव आहे.

हत्या करून आरोपीने काढला पळ : मेळघाटातील बिरोटी गावात ५१ वर्षीय मृत महिलेची शेती आहे. तर आरोपी सचिनची देखील तेथे शेती आहे. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी ८ च्या आसपास ती महिला शेतात आली. तेथे शेतीच्या धुऱ्यावर बैल चारण्याच्या कारणावरून आरोपी सचिन व तिच्यात वाद झाला. झटापट झाली. त्यादरम्यान, सचिनने शेताच्या धुऱ्यावर तिच्यावर बलात्कार केला. तिने प्रचंड प्रतिकार केला. मात्र, तो प्रतिकार मोडून काढत त्याने तिची दगडाने ठेचून हत्या केली. तिचा खून केल्यानंतर आरोपीने तिला धुऱ्यावर निर्वस्त्र टाकून पळ काढला.

सायंकाळी उघड झाली घटना : सायंकाळचे सात वाजल्यानंतर पत्नी घरी न आल्याने तिच्या पतीने शेत गाठले. त्यावेळी परिसरातील शेतकरी मनोज जाधव याने आरोपी सचिन येथून पळत गेल्याची माहिती त्याला दिली. शेताच्या बांधावर पोहोचताच त्याला पत्नी निर्वस्त्र व मृतावस्थेत आढळली. पत्नीला बघताच त्याच्या पायाखालील वाळू सरकली. तो लगेच गावाकडे धावला. त्याबाबत पोलीस पाटलाला कळविले. या घटनेची माहिती मिळताच आयपीएस गौहर हसन व धारणीचे ठाणेदार सुरेंद्र बेलखेडे, पोलीस उपनिरिक्षक रीना सदार घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने तिचा मृतदेह रात्री उशिरा धारणी उपजिल्हा रुग्णालयात आणला. आरोपीचा रात्रीच शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली. गुरुवारी सकाळी उपजिल्हा रुग्णालयात तिचे शवविच्छेदन करून पार्थिव कुटुंबियांच्या सुपुर्द करण्यात आले.

हेही वाचा - Aurangabad Crime: घरगुती वादातून महिलेने पोलीस आयुक्तालयात घेतलं पेटवून

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.