ETV Bharat / state

अमरावती: वीस वर्षांची न्यायालयीन लढाई जिंकली; तरीही मोबदला नाहीच - येवती शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

अमरावती जिल्ह्यातील येवती येथील शेतकऱ्यांच्या जमिनी 1994-95 या वर्षात संपादित केल्या होत्या. मात्र, या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळाला नाही. त्यामुळे 20 ते 25 शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली. सुमारे वीस वर्ष हे प्रकरण दिवाणी न्यायालयात सुरू होते. 29 एप्रिल 2014 ला सदर प्रकरणात शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

वीस वर्षांनंतरही शेतकरी मोबदल्याच्या प्रतिक्षेत
वीस वर्षांनंतरही शेतकरी मोबदल्याच्या प्रतिक्षेत
author img

By

Published : Dec 6, 2019, 12:29 PM IST

अमरावती - वीस वर्षांपूर्वी शासनाने येवती येथील शेतकऱ्यांच्या जमीनी संपादित करून घेतली. मात्र त्याचा मोबदला दिला नाही. आपल्या हक्काचा मोबदला मिळवण्यासाठी न्यायालयात सुरू असलेला खटला जिंकल्यावरही जलसंधारण विभागात चकरा माराव्या लागत आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंत्याच्या दालनात ठिय्या मांडला. लवकरात लवकर मोबदला मिळाला नाही, तर 21 डिसेंबरपासून आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

वीस वर्षांनंतरही शेतकरी मोबदल्याच्या प्रतीक्षेत

अमरावती जिल्ह्यातील येवती येथील शेतकऱ्यांच्या जमिनी 1994-95 या वर्षात संपादित केल्या होत्या. मात्र, या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळाला नाही. त्यामुळे 20 ते 25 शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली. सुमारे वीस वर्ष हे प्रकरण दिवाणी न्यायालयात सुरू होते. 29 एप्रिल 2014 ला सदर प्रकरणात शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.

मात्र, न्यायालयाचे आदेश असूनही शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला मिळाला नाही. आपल्या हक्काचा पैसा मिळत नसल्यामुळे या शेतकऱ्यांनी 7 डिसेंबर पासून जलसंधारण विभागासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे शुक्रवारी कार्यकारी अभियंत्यांनी या शेतकऱ्यांना चर्चेसाठी बोलावले होते. या शेतकऱ्यांनी काँग्रेस नेते प्रकाश साबळे यांच्या नेतृत्वात कार्यकारी अभियंता पाटील यांच्या दालनात ठिय्या दिला. यावेळी वृद्ध शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. सुनावणीच्या काळात काही शेतकरी दगावल्याने त्यांच्या विधवा पत्नी कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात उपस्थित होत्या.

पाटील यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून 20 डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांचा 94 लाख रुपये मोबदला देण्याचे आश्वासन दिले. यावेळी लक्ष्मण डुकरे, लीला डुकरे, बाळासाहेब ढेने, रामचंद्र वासनकर, गीता वासनकर, किसन गवळी, मारुती वासनकर, देवका तायडे, पंजाब डुकरे, तुळसा नाईक, संतोष वानखेडे, सरस्वती मोहोड, गणेश घोंगडे, शोएब अहमद हे शेतकरी उपस्थित होते.

Intro:वीस वर्षांपूर्वी शासनाने जमीन संपादित केल्यावर त्याचा मोबदला दिला नाही . मोबदला मिळावा यासाठी न्यायालयात सुरू असलेली लढाई जिंकल्यावर मोबदला मिळेल अशी अपेक्षा असताना दोन वर्षापासून आपल्या हक्काच्या पैशांसाठी जलसंधारण विभागात चक्र माराव्या लागत असल्याने आज वृद्ध शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंता यांच्या दालनात ठिय्या मांडला. आम्हाला मोबदला मिळाला नाही तर 21 डिसेंबर पासून तीव्र भूमिका घेऊ असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

Body:अमरावती जिल्ह्यातील येवती येथील शेतकऱ्यांच्या जमिनी 1994-95 सालात संपादित केल्या होत्या. मात्र या जमिनीचा मोबदला मिळाला नसल्याने 20 ते 25 शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली. सुमारे वीस वर्ष हे प्रकरण दिवाणी न्यायालय समोर असताना 29 एप्रिल 2014 रोजी सदर प्रकरणाचा निकाल दिवाणी न्यायालयाने जाहीर करून संबंधित सर्व शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्याचे आदेश पारित केले. आता आपल्याला जमिनीचा मोबदला मिळेल अशी आशा शेतकर्‍यांना असताना 2014 पासून आज पर्यंत शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला मिळाला नाही. आपल्या हक्काचा पैसा मिळत नसल्यामुळे या शेतकऱ्यांनी 7 डिसेंबर पासून जलसंधारण विभागात समोर उपोषण करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान आज कार्यकारी अभियंत्यांनी या शेतकऱ्यांना चर्चेसाठी बोलाविले होते. यामुळे उपोषणा पूर्वी या शेतकऱ्यांनी काँग्रेसचे प्रकाश साबळे यांच्या नेतृत्वात जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता पाटील यांच्या दालनात ठिय्या देऊन आमचा मोबदला कधी मिळणार असा जाब विचारला. यावेळी वृद्ध शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. अनेक शेतकरी दगावल्याने त्यांच्या या वृद्ध पत्नी मोबदला मागण्यासाठी कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात उपस्थित होत्या. कार्यकारी अभियंता पाटील यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून 20 डिसेंबर शेतकऱ्यांचा 94 लाख रुपये मोबदला मी निश्चितपणे देऊ असे आश्वासन दिले. पाटील यांच्या आश्वासनानंतर 'साहेब तुमची 20 तारीख आम्हाला मान्य आहे मात्र आम्हाला जर 20 डिसेंबरला ही घरी रिकाम्या हाताने परतावे लागले तर 21 21 तारीख ही आमची असेल'. असा इशाराही वृद्ध शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंता पाटील यांना दिला.
यावेळी लक्ष्मण डुकरे ,लीला डुकरे, बाळासाहेब ढेने, रामचंद्र वासनकर, गीता वासनकर, किसन गवळी, मारुती वासनकर, देवका तायडे, पंजाब डुकरे, तुळसा नाईक, संतोष वानखेडे, सरस्वती मोहोड, गणेश घोंगडे, शोएब अहमद आदी वृद्ध शेतकरी उपस्थित होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.