ETV Bharat / state

अकोला बलात्कार आणि हत्या प्रकरण : आरोपींना फाशी द्या, अमरावतीमध्ये मातंग समाजाचा मोर्चा - amravati agitation matang samaj

अकोट तालुक्यातील मारोडा येथे 14 डिसेंबरला घडलेल्या घटनेनंतर अमरावती विभागात खळबळ उडाली. या प्रकरणात अद्याप दोषींवर कुठलीही कारवाई झाली नाही. यामुळे येथील नेहरू मैदानापासून विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.

agitation in amravati justice for akola rape and murder case
अकोल्यातील बलात्कार आणि हत्या प्रकरण : अमरावतीत मोर्चा
author img

By

Published : Jan 16, 2020, 6:51 PM IST

Updated : Jan 16, 2020, 8:15 PM IST

अमरावती - अकोला जिल्ह्यात अकोट तालुक्यातील मारोडा या गावात इयत्ता बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर 4 नराधमांनी बलात्कार करुन तिची हत्या केली होती. ही घटना 14 डिसेंबरला घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ आज (गुरूवारी) शहरात मातंग समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणात विशेष लक्ष देऊन आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

अकोला बलात्कार आणि हत्या प्रकरण

अकोट तालुक्यातील मारोडा येथे 14 डिसेंबरला घडलेल्या घटनेनंतर अमरावती विभागात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात अद्याप दोषींवर कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे येथील नेहरू मैदानापासून विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मोर्चात विदर्भातील मातंग समाज बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

हेही वाचा - उदयनराजेंवरील टीकेनंतर साताऱ्यात बंद, गाढवांच्या गळ्यात राऊत-आव्हाडांच्या पाट्या बांधून निषेध

यावेळी मोर्चातील शिष्टमंडळाने विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांना निवेदन सादर केले. निवेदनात सदर प्रकरणात पोलिसांनी योग्य अशी कारवाई करून आरोपींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी करण्यात आली. मोर्चादरम्यान पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. उत्तमराव भजने, दादासाहेब शिरसागर, सुरेश स्वर्गे, गणेश गायकवाड, डॉ.रुपेश खडसे, गणेश कलाने, पंकज जाधव, बबन इंगोले, रवी वानखडे, गंगा अंबारे आदींनी या मोर्चाचे नेतृत्व केले.

Intro:अकोला जिल्ह्यात अकोट तालुक्यातील मारोडा या गावात इयत्ता बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनी वर चार नराधमांनी बलात्कार करुन तिची हत्या केल्याच्या निषेधार्थ आज अमरावती शहरात मातंग समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणात विशेष लक्ष देऊन आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी कारवाई करण्याची मागणी मोर्चादरम्यान करण्यात आली.

Body:अकोट तालुक्यातील मारोडा येथे 14 डिसेंबरला घडलेल्या घटनेनंतर अमरावती विभागात खळबळ उडाली या प्रकरणात अद्याप दोषींवर कुठलीही कारवाई झाली नसल्याने अमरावतीच्या नेहरू मैदान येथून विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात विदर्भातील सर्व जिल्ह्यातून मातंग समाज बांधव सहभागी झालेत.
हा मोर्चा विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयावर धडकला मोर्चातील शिष्टमंडळाने विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांना निवेदन सादर करून या प्रकरणात पोलिसांनी योग्य अशी कारवाई करून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी सहकार्य करावे अशी मागणी केली. मोर्चादरम्यान पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. उत्तमराव भजने दादासाहेब शिरसागर, सुरेश स्वर्गे,गणेश गायकवाड डॉ.रुपेश खडसे, गणेश कलाने, पंकज जाधव,बबन इंगोले,रवी वानखडे गंगा अंबारे ,यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले.

Conclusion:
Last Updated : Jan 16, 2020, 8:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.