ETV Bharat / state

Amravati News : दिव्यांगत्वावर मात करून अब्दुल झाला बॉडी बिल्डर; अनेक बॉडी बिल्डिंग स्पर्धेत जिंकली पदके - Abdul Outstanding Performance In Body Building

अमरावतीतील शरीराने अपंग असलेल्या शेख अब्दुल शेख अब्रार या तरुणाने अनेक बॉडी बिल्डिंग स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शरीराने अपंग असलेल्या शेख अब्दुल शेख अब्रार या तरुणाने लहानपणीपासूनच जिद्द आणि मेहनत कायम राखली आहे.

Amravati News
बॉडी बिल्डर अब्दुल
author img

By

Published : Jul 5, 2023, 10:50 PM IST

माहिती देताना अब्दुल शेख शेख अब्रार

अमरावती : वाशिम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यातील तिवळी या छोट्याशा गावात जन्मलेल्या शेख अब्दुल शेख अब्रार हा बॉडी बिल्डर झाला. केवळ शरीर बळकट करूनच तो थांबला नाही तर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर आयोजित बॉडी बिल्डिंग स्पर्धेत त्याने अनेक पदक पटकाविले. आता थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर बाजी मारण्यासाठी अब्दुलचा संघर्ष सुरू आहे.

बॉडी बिल्डिंग क्षेत्रात अब्दुलने अशी गाठली मजल : वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात येणाऱ्या तिवळी या गावात मिस्त्री काम करणारे शेख अबरार हे देखील पहलवान होते. त्यांना तीन मुले आहेत यापैकी दुसऱ्या क्रमांकाचा शेख अब्दुल शेख अब्रार हा दिव्यांग. दिव्यांग असला तरी शेख अब्रार याने लहानपणीपासूनच जिद्द आणि मेहनत कायम राखली. मोठा भाऊ शेख खुर्शीद शेख अब्रार हा पहिलवान आहे. मोठ्या भावाची पहेलवानी आणि त्याची मेहनत शेक अब्दुल शेख अबरार याला देखील लहानपणीच व्यायामाची आवड जडली. ह्या आवडीतूनच त्याने प्रचंड मेहनतीच्या बळावर आपले शरीर पिळदार मजबूत असे तयार केले.

मिस्टर इंडिया स्पर्धेत चौथे स्थान : अब्दुलने पिळदार शरीर घेऊन बॉडी बिल्डिंग स्पर्धेत उतरण्याचा त्यांनी निश्चय केला. आज एक दोन नव्हे तर असंख्य स्पर्धेमध्ये सहभागी होऊन शेख अब्रार शेख अब्दुल याने सुवर्ण कास्य असे अनेक पदक पटकावलेत. पावर लिफ्टिंग स्पर्धेत त्याने दोन राष्ट्रीय पातळीवर दोन सुवर्ण एक रौप्य आणि एक कास्यपदक मिळवले आहे. आग्रा येथे आयोजित मिस्टर इंडिया स्पर्धेत त्याने चौथे स्थान पटकावले. सायकलिंगमध्ये देखील शेख अबरार प्रचंड मेहनत घेतो. 2017 मध्ये सायकलिंगच्या राज्य पातळीवरील स्पर्धेत त्याने कास्यपदक पटकावले.

अशी घेतली मेहनत : आपल्या छोट्याशा खेड्या गावात आपले स्वप्न पूर्ण होणार नाही असे लक्षात आल्यावर शेख अब्दुल शेख अब्रार यांनी थेट अमरावती शहर गाठले. सुरुवातीला राहुल नगर परिसरात तो राहायचा. रोज पहाटे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे जाऊन त्याने आपले पिदार शरीर घडवले. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा अशा तीनही ऋतूत एक दिवसही खंड न पाडता शेख अब्दुल शेख अब्रार याचे प्रयत्न सुरूच होते. या प्रयत्नादरम्यान त्याच्या डाव्या खांद्याला जबर इजा झाली. मात्र बॉडी बिल्डिंग क्षेत्रात आपल्याला करिअर करायचे, अनेक पदक जिंकायचे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी व्हायचे. खांद्याला दुखापत झाल्यामुळे तीन चाकी सायकल चालवणे कठीण झाले. मात्र हा त्रास आता सहन केला तर पुढे चांगले दिवस येतील या आशेवर त्यांने मेहनत केली. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ सोबतच काही काळ नरेंद्र भिवापूरकर अंध महाविद्यालय येथील व्यायाम शाळेत देखील व्यायाम केला. तसेच फ्रेझरपुरा परिसरातील खाजगी जिममध्ये देखील सराव केल्याचे शेख अब्दुल शेख अब्रार म्हणाला.

आमदार बच्चू कडूंनी दिला मोठा आधार : बॉडी बिल्डिंग क्षेत्रात करिअर करायचे असल्यामुळे अब्दुल अमरावतीत आला. त्यांच्या भावाने त्याला झेपेल तितकी सर्व मदत केली. माझे दोन्ही भाऊ माझ्यासाठी मोठा आधार आहेत. अमरावतीत आल्यावर आमदार बच्चू कडू यांची भेट झाली त्यांना मी माझ्या बॉडी बिल्डिंग क्षेत्राबाबत संपूर्ण माहिती दिली. मला मिळालेले सर्व पदक प्रमाणपत्र आमदार बच्चू कडू यांनी पाहिले. यानंतर कुठलीच काळजी करायची नाही मी तुझ्यासोबत आहे असा केवळ शब्दच न देता, अमरावती शहरात शासकीय विश्राम भवन परिसरात मला राहायची आणि जेवणाची व्यवस्था करून दिली. आमदार बच्चू कडू यांनी दिलेल्या मोठ्या आधारामुळे माझ्या जिद्दीला आणि मेहनतीला अधिक धार मिळाली आहे. येणाऱ्या काही काळात मी आंतरराष्ट्रीय पातळीवर बॉडी बिल्डिंग स्पर्धेत बाजी मारेल असा विश्वास अब्दुलने व्यक्त केला. तर ऑलम्पिकमध्ये जाण्याचे देखील स्वप्न असून ते पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करतो आहे असे, शेख अब्दुल शेख अब्रार म्हणाला.

हेही वाचा -

  1. WOMEN BODYBUILDER PERFORMANCE : रतलाममध्ये महिला बॉडीबिल्डरच्या कामगिरीला काँग्रेस आणि हिंदू संघटनांचा विरोध, वाचा सविस्तर
  2. Achievements 75 महिला डॉक्टर बनली बॉडी बिल्डर जागतिक स्तरावर कमवले नाव
  3. Body Builder Priya Singh: बॉडी बिल्डर प्रिया सिंह मेघवालने थायलंडमध्ये सुवर्णपदक जिंकले, म्हणाली, 'बिकिनी माझा पोशाख..'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.