अमरावती - शहरात दोन मजली इमारतीमध्ये खालच्या मजल्यावर श्रीकृष्ण दूध डेरी आणि वरच्या मजल्यावर नरेंद्र इलेक्ट्रॉनिक्स अशी दुकाने होती. मगंवारी सकाळी नेहमीप्रमाणे डेअरीचे संचालक गुप्ता यांनी आपली दुध डेरी उघडली होती. पावणे बारा वाजेच्या सुमारास इमारतीच्या मागच्या बाजूची भिंत खचत असल्याचे लक्षात येताच दूध गुप्ता आणि डेअरीत काम करणारे कामगार लगेच बाहेर धावून आले. आणि काही क्षणातच संपूर्ण इमारत कोसळली. सुदैवाने दूध डेअरी मधील सर्वजण आधीच बाहेर धावून आल्यामुळे या अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नाही.
मुसळधार पावसामुळे रस्त्यावर शुकशुकाट - शुक्रवारी पहाटेपासूनच मुसळधार पाऊस( Amravati torrential rains) कोसळत असल्यामुळे शहरातील सर्वाधिक गजबजलेला गांधी चौक ते अंबादेवी मार्गावर रोजच्यापेक्षा गर्दी कमी होती. इमारत कोसळणार याचा अंदाज आल्यावर इमारतीच्या तळमजल्यावर असणाऱ्या दूध डेअरी मधील कामगार इमारती बाहेर पडल्यामुळे परिसरात आरडा ओरड झाली आणि हा रस्ता परिसरातील युवकांनी रहदारीसाठी बंद केला. या मार्गावर सकाळी आणि दुपारच्या वेळी मोठ्या प्रमाणात शाळकरी विद्यार्थ्यांची गर्दी असते . मात्र पाऊस सुरू असल्यामुळे आज नेहमीपेक्षा गर्दी कमी होती . परिसरातील युवकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे हा मार्ग बंद करण्यात आल्यामुळे अतिशय गर्दीच्या ह्या मार्गावर काही क्षणातच शुकशुकाट पसरल्यावर दोन मजली इमारत खाली कोसळली.
घटनास्थळीची पोलीस आयुक्त यांनी केली पाहणी - घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून. रस्त्यावर पडलेला इमारतीचा ढिगारा बाजूला करण्याचे काम जेसीबीच्या माध्यमातून सुरू आहे. तसेच अग्निशमन दलाचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले असून परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. गांधी चौक परिसरात इमारत कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह (Commissioner of Police Dr Aarti Singh) या पोलीस उपायुक्त विक्रम साडी यांच्यासह घटनास्थळी पोहोचल्या. पोलीस आयुक्तांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कोसळलेल्या इमारती संदर्भात माहिती जाणून घेतली. पोलिसांनी गांधी चौक कडून अंबादेवी मंदिर (Ambadevi Temple Amravati) परिसर तसेच गौरक्षण कडे जाणारा मार्ग तातडीने बंद केला आहे.
हेही वाचा : Maharashtra Live Breaking News : अमरावती शहरात दोन मजली इमारत कोसळली, सुदैवाने जीवितहानी नाही