ETV Bharat / state

Minor Girl Delivered In Amravati : अल्पवयीन विद्यार्थिनी झाली कुमारी माता - अल्पवयीन विद्यार्थिनी झाली कुमारी माता

अमरावतीमध्ये शाळेत शिकणारी 16 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनी कुमारी माता झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. या मुलीने मंगळवारी येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात एका मुलीला जन्म दिला आहे.

File photo
फाईल फोटो
author img

By

Published : Jan 25, 2023, 4:33 PM IST

अमरावती : गाडगे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गाडगे नगर परिसरात तीन विद्यार्थिनी एका घरात भाड्याने राहतात. यापैकी एका सोळा वर्षीय विद्यार्थिनीचे सोमवारी रात्री पोट दुखायला लागल्यामुळे तिला मंगळवारी पहाटे येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तपासणी दरम्यान डॉक्टरांना ती गर्भवती असल्याचे लक्षात आले. डॉक्टरांनी याबाबत गाडगे नगर पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, मंगळवारी सकाळी तिला प्रसववेदना होऊ लागल्याने तिने एका मुलीला जन्म दिला आहे.

आई-वडिलांना बसला धक्का : दरम्यान हा संपूर्ण प्रकाराबाबत अल्पवयीन विद्यार्थिनीच्या मैत्रिणींनी तिच्या आई-वडिलांना माहिती दिल्यावर त्यांना जबर धक्का बसला. आई वडील वरूड येथे राहत असून हा प्रकार ऐकल्यावर ते अमरावतीत यायला तयारच नव्हते. मात्र, घाडगे नगर पोलिसांनी त्यांची विनवणी केल्यावर ते अमरावतीला डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती रुग्णालयात पोहोचले.

गुन्हा दाखल आरोपीचा शोध सुरू : गाडगे नगर पोलीस आणि बालकल्याण समितीच्या पथकाने पीडित विद्यार्थिनीची सामंजस्याने चौकशी केल्यावर तिने तिच्यावर वरुड येथे बळजबरी करणाऱ्या आरोपीचे नाव सांगितले. तसेच, त्याचा मोबाईल क्रमांक देखील दिला आहे. यानंतर पोलिसांनी मंगळवारी रात्री तिचे बयान नोंदविल्यावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान गाडगे नगर पोलिसांनी या प्रकरणात दाखल केलेला गुन्हा हा वरुड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आल्याची माहिती गाडगे नगरचे ठाणेदार आसाराम चोरमले यांनी दिली आहे.

हेही वाचा : Birth of Twins : 'ही' आहे जुळ्या मुलांच्या जन्मामागची कहाणी!

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.