ETV Bharat / state

कपडे धुताना मुलगी बुडाली कालव्यात, शोध सुरू

तिवसामध्ये पाल टाकून मध्यप्रदेशातील मडिया कुटुंब वास्तव्याला आहे. जडीबुटी विकण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. या कुटुंबातील महिला आणि मुली आज कपडे धुण्यासाठी कालव्यावर गेल्या होत्या. कपडे धुताना मंदाकिनीचा तोल गेला आणि ती वाहून गेली.

drown
कपडे धुताना मुलगी बुडाली कालव्यात, शोध सुरू
author img

By

Published : Feb 4, 2020, 9:27 PM IST

Updated : Feb 4, 2020, 9:34 PM IST

अमरावती - जिल्ह्यातील तिवसा सातरगाव रोडवरील मुख्य कालव्यात दुपारी १३ वर्षीय मुलगी वाहून गेल्याची घटना घडली. मंदाकिनी सुबेदार मडिया असे या मुलीचे नाव आहे. बचाव पथकाच्या मदतीने तिवसा पोलीस या मुलीचा शोध घेत आहेत.

कपडे धुताना मुलगी बुडाली कालव्यात, शोध सुरू

तिवसामध्ये पाल टाकून मध्यप्रदेशातील मडिया कुटुंब वास्तव्याला आहे. जडीबुटी विकण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. या कुटुंबातील महिला आणि मुली आज कपडे धुण्यासाठी कालव्यावर गेल्या होत्या. कपडे धुताना मंदाकिनीचा तोल गेला आणि ती वाहून गेली. कालवा तुडुंब भरला असल्याने सोबतच्या महिला तिला वाचवू शकल्या नाहीत.

हेही वाचा - औरंगाबादेत सातवीतील विद्यार्थिनीला शिक्षकानेच दाखवले पॉर्न व्हिडिओ; गुन्हा दाखल

माहिती मिळताच तिवसा पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे. अमरावतीतील बचाव पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. पाण्याचा वेग जास्त असल्याने तुर्तास आजचे बचावकार्य थांबवण्यात आले आहे. उद्या सकाळी पुन्हा मंदाकिनीचा शोध घेतला जाणार आहे. कालव्यातील पाणी कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा - तेलंगणाच्या धरणाचा गडचिरोलीला फटका; मेडीगट्टाचे दरवाजे बंद केल्याने शेतात पाणी

Intro:-13 वर्षीय मुलगी कालव्यात वाहून गेली
-अमरावतीच्या तिवसा येथील घटना

अमरावती अँकर
अमरावती जिल्ह्यातील तिवसा सातरगाव रोडवरील मुख्य कालव्यात मंदाकिनी सुबेदार मडिया वय 13 नामक मुलगी आज दुपारी 1वाजता दरम्यान तोल गेल्याने वाहून गेल्याची घटना घडली.

प्राप्त माहितीनुसार तिवसा येथे पाल टाकून वास्तव असलेले व मूळचे मध्यप्रदेश येथील रहिवासी मडिया कुटुंब काही दिवसापूर्वी जळी-बुटीचा व्यवसाय करण्यासाठी तिवसा शहरात आले आहे. आज कुटुंबातील महिला व मुली कपडे धुण्याकरिता कालव्यावर गेल्या असता कपडे धूत असलेली मंदाकिनी सुबेदार मडिया वय 13 नामक मुलगीचा तोल गेल्याने ती वाहून गेली, कालवा तुडुंब भरून असल्यामुळे वाहत्या पाण्यात काही क्षणातच मुलगी बुडाली, इतर महिलांनी मदतीची हाक दिली मात्र पाण्याचा वेग जास्त असल्याने तिला मदत पोहचू शकली नाही प्रकरणी तिवसा पोलिसांनी शोध मोहीम सुरु केली असून घटनास्थळी अमरावती येथील रेस्क्यू टीम दाखल झाली आहे,त्यांनी काही वेळ शोध मोहीम केली मात्र पाणी जास्त असल्यामुळे त्यांचे प्रयत्न व्यर्थ ठरले कालव्याचे पाणी कमी झाले की पुन्हा उद्या सकाळी रेस्क्यू टीम द्वारे शोध मोहीम करण्यात येणार असल्याची माहिती टीम कडून देण्यात आली असून कालव्याचे पाणी ही कमी करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी घटनास्थळी मडिया कुटुंबांचा आक्रोश असून नागरिकांची ही मोठी गर्दी होती.Body:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : Feb 4, 2020, 9:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.