ETV Bharat / state

Bacchu kadu : ८२६ कोटींच्या वासनी मध्यम प्रकल्पाच्या खर्चास सुधारित मान्यता- आ.बच्चूभाऊ कडू - वासनी जलसंपदा प्रकल्प

जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील वासनी मध्यम प्रकल्पाच्या ८२६ कोटींच्या खर्चास सुधारित मान्यता देण्यात आली. त्यामुळे ४ हजार ३१७ हेक्टर क्षेत्राला लाभ मिळणार आहे, असे माजी जलसंपदा राज्यमंत्री तथा आमदार बच्चूभाऊ कडू यांनी आज सांगितले.

आ.बच्चूभाऊ कडू
आ.बच्चूभाऊ कडू
author img

By

Published : Nov 29, 2022, 11:08 PM IST

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील वासनी जलसंपदा प्रकल्पाला सुधारित मान्यता देऊन त्यांच्या कामांना वेग देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. वासनी मध्यम प्रकल्पाचे काम गतीने होण्यासाठी आवश्यक खर्चास मान्यता मिळण्याबाबत आमदार श्री. कडू यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला. त्यानुसार मान्यता मिळाल्याने प्रकल्पाचे काम गती घेणार आहे.

जिल्ह्यातील ४ हजार ३१७ हेक्टर क्षेत्राला मिळणार लाभ : आमदार श्री. कडू म्हणाले की, अचलपूर तालुक्यातील १६, दर्यापूर तालुक्यातील ४ व अंजनगांव तालुक्यातील ३ गावांना सिंचनाचा फायदा होणार आहे. या प्रकल्पास २००८-०९ मध्ये सुरुवात झाली. भूसंपादन, पुनवर्सन आदी बाबींचा खर्चामुळे प्रकल्प किमतीत वाढ झाली.वाढीव किमतीस मान्यता नसल्याने प्रकल्प २०१७ पासून बंद होता. शासनाने आता सुधारित खर्चास मान्यता दिल्याने प्रकल्पाचे काम वेग घेणार आहे.

२०२४ पूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन : प्रकल्पाचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. धरण व सांडव्याचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. पुनर्वसनाचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. सिंचनासाठी बंदिस्त जलवाहिनीद्वारे सिंचन प्रस्तावित आहे. प्रकल्पावर आतापर्यंत ६०३ कोटी रु. खर्च झाला असून उर्वरित काम जून २०२४ पूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

३४ गावांना मिळणार लाभ :प्रकल्पामुळे सिंचनाचे क्षेत्र वाढून कृषी उत्पादकतेत भर पडणार आहे, असा विश्वास श्री. कडू यांनी व्यक्त केला.त्याचप्रमाणे, सपन प्रकल्पाच्या ४९५.२९ कोटी खर्चास मान्यता मिळाल्याने ३४ गावांत लाभ होऊन ६ हजार ३८० हेक्टर सिंचन होणार आहे. राजुरा लघु प्रकल्पाच्या १९३.८१ कोटी खर्चास मान्यता मिळाल्याने एक हजार हेक्टर सिंचन होणार आहे. राजुरा, सपन, वासनी या तिन्ही प्रकल्पांचे काम मार्गी लागले असून एकूण १ हजार ५१६ कोटी सुधारित मान्यतेमुळे काम पूर्ण होऊन सिंचन क्षेत्रात ११ हजार ६९७ हेक्टरची वाढ होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.