ETV Bharat / state

अखेर अमरावतीमध्ये लॉकडाऊनला सुरुवात

अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता अमरावती शहर आणि अचलपूर शहरात सात दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी काल केली होती. या लॉकडाऊनची सुरुवात आज सायंकाळी 8 वाजेपासून झाली आहे.

lockdown started in Amravati
अखेर अमरावतीमध्ये लॉकडाऊनला सुरुवात
author img

By

Published : Feb 22, 2021, 10:21 PM IST

अमरावती - अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता अमरावती शहर आणि अचलपूर शहरात सात दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी काल केली होती. या लॉकडाऊनची सुरुवात झाली आहे. दरम्यान अमरावती, अचलपूर आणि तिवसा परिसरातील 9 गावांमध्ये देखील लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. आजपासून 1 मार्चपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे.

अखेर अमरावतीमध्ये लॉकडाऊनला सुरुवात

जीवनावश्यक वस्तूंची दुकाने राहणार सुरू

ज्या प्रमाणे अमरावती आणि अचलपूर शहरामध्ये लॉकडाऊनचे नियम असणार आहेत, तेच नियम या सर्व गावांना देखील लागू करण्यात आले आहेत. या सर्व गावांमध्ये जीवनावश्यक वस्तूंची सर्व दुकाने ज्यामध्ये मेडिकल, भाजीपाला दुकाने, किराणा दुकाणे हे सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी 8 ते दुपारी 3 या वेळेत सुरू राहणार आहेत. या दरम्यान सर्व आठवडी बाजार, शाळा, खासगी क्लासेस बंद राहणार आहेत. तसेच शासकीय कार्यालयात देखील केवळ 15 टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती असणार आहे. या संपूर्ण परिस्तिथीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वप्निल उमप यांनी.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.