अमरावती - आपल्या घरासमोर खेळत असणाऱ्या मुलीला बोलावण्यासाठी गेलेल्या आईला व खेळणाऱ्या मुलीला भरधाव चारचाकी वाहनाने चिरडल्याची घटना आज (सोमवार) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास अमरावतीच्या धामणगाव रेल्वे लगत असलेल्या दत्तापूर गावात घडली. यात सहा वर्षीय चिमुकली सिद्धी पंकज पतालीया हिचा मृत्यू झाला असून आई गंभीर जखमी झाली आहे.
आज सायंकाळी सातच्या सुमारास सिद्धी ही घराजवळ खेळत होती. याच दरम्यान तिला बोलावण्यासाठी तिची आई गेली असताना याच वेळी शहरातून यवतमाळकडे जाणाऱ्या एका अज्ञात चारचाकी गाडीने मायलेकीला उडवले. यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर तिच्या आईवर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा - चारचाकी-दुचाकीची समोरासमोर धडक, दुचाकीने घेतला पेट