ETV Bharat / state

5 People with Tractor in Flood Water : पुराच्या पाण्यात चालकाने घातला ट्रॅक्टर; ट्रॅक्टरसह 5 जण गेले वाहून - 5 Persons with Tractor were Swept Away in Flood Water

संपूर्ण अमरावती जिल्ह्यात ( Amravati District Rain ) संततधार पाऊस ( Rain Continuing in Amravati ) सुरू आहे. अशातच नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जावरा मोळवण येथून वाहणाऱ्या बेंबळा नदीला मोठा पूर ( Flood Water on Bridge at Jawara Molvan ) आला आहे. तेथूनच एका ट्रॅक्टरवरून ५ जण नांदगाव ते जावरा मोळवण मार्गाने जात होते. त्या मार्गावर पुलावरून पाणी ओसंडून वाहत असतानासुद्धा, चालकाने तसाच ट्रॅक्टर पुढे नेला. त्यामुळे ट्रॅक्टर 5 जणांसह पाण्यात ( Tractor Got Swept Away in Water ) वाहून गेला.

Tractor in Flood Water
ट्रॅक्टरसह 5 जण गेले वाहून
author img

By

Published : Aug 9, 2022, 7:05 AM IST

Updated : Aug 9, 2022, 10:00 AM IST

अमरावती : पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने आणि पुलाला कठडे नसल्याने ( Amravati District Rain ) ट्रॅक्टरवरील ५ जणांसह ट्रॅक्टर वाहून गेल्याची धक्कादायक घटना नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील बेंबळा नदीवरील पूल ओलांडताना जावरा मोळवण येथे ( Flood Water on Bridge at Jawara Molvan ) आज सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान घडली. पुराच्या पाण्यात ट्रॅक्टर घालणे ( Tractor Got Swept Away in Water ) सगळ्यांच्या जीवावर बेतले. जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू ( Rain Continuing in Amravati ) असल्याने अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकणी नद्या-नाल्यांना पूर आला आहे.

ट्रॅक्टरसह 5 जण गेले वाहून

नदीला पूर आलेला असल्याने पुलावर पाणीच पाणी : संपूर्ण जिल्ह्यात कालपासून संततधार सुरू आहे. जिल्ह्याच्या काही भागांत ढगफुटीसदृश पावसाची स्थिती आहे. नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अशातच नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जावरा मोळवण येथून वाहणाऱ्या बेंबळा नदीला मोठा पूर आला आहे. एका ट्रॅक्टरवरून ५ जण नांदगाव ते जावरा मोळवण मार्गाने जात होते. त्यामार्गावर पुलावरून पाणी ओसंडून वाहत असतानासुद्धा, ट्रॅक्टर चालकाने पुलावरून जाता येईल, असे वाटल्याने, चालकाने ट्रॅक्टर तसाच पुढे नेला.

दोन जण वाचले; तिघे बेपत्ता : पाच जण ट्रॅक्टरवर असताना चालकाने ट्रॅकर पुलावरून काढला. पण, पुराच्या पाण्यामुळे त्याला पुलावरून वाहणाऱ्या पाण्याचा चालकाला अंदाज आला नाही. पुलाला कठडे नसल्याने अंदाजे पूल पार करणे तिघांच्या जीवावर बेतले. चालकाला पाण्याचा आणि रस्त्याचा अंदाज न आल्याने चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटून ट्रॅक्टर नदीत गेला. ट्रॅक्टर बुडताना पाहून दोन जण कसेतरी बाहेर पडले. पण, तीन जणांचा अद्याप पत्ता लागला नाही.

तिघांचा तपास सुरू आहे : चालकाला पाण्याचा आणि रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रॅक्टर नदीत गेला. ट्रॅक्टर बुडताना पाहून दोन जण कसेतरी बाहेर पडले. पण, तीन जणांचा अद्याप पत्ता लागला नाही. अक्षय रामटेके (Akshay Ramteke) ( रा. पळसमंडळ नारायण परतेकी, पळसमंडळ ) या दोघांना बाहेर काढण्यात यश आले. सुरेंद्र डोंगरे (रा. पळसमंडळ) शेषराव चावके व मारोती चावके (Maroti Chawke) हे तिघेही धर्मापूर येथील रहिवासी वाहून गेले. या तिघांचा शोध घेण्यात आला. पण, अजूनही त्यांचा थांगपत्ता लागू शकला नाही, अशी माहिती तलाठी राठोड यांनी नांदगाव खंडेश्वर तहसीलदार यांना दिलेल्या प्राथमिक अहवालातून दिली आहे.

हेही वाचा : Maharashtra Cabinet Expansion : शिंदे सरकार अ‍ॅक्शन मोडवर; मंगळवारी मंत्रीमंडळ विस्तार, तर बुधवारपासून अधिवेशन

Last Updated : Aug 9, 2022, 10:00 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.