ETV Bharat / state

सुखद बातमी, अमरावती विभागाच्या ५०९ प्रकल्पात ३५ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक

author img

By

Published : May 18, 2020, 11:17 AM IST

अमरावती विभागातील मोठे, मध्यम आणि लघु असे एकूण ५०९ प्रकल्पात, मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ३५ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. पावसाळा काही दिवसांवर ठेपला आहे. यामुळे यंदाच्या वर्षी अमरावतील विभागात पाण्याची टंचाई होणार नाही.

35 percent water stock in amravati region
सुखद बातमी, अमरावती विभागाच्या ५०९ प्रकल्पात ३५ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक

अमरावती - विभागातील पाच जिल्ह्यामध्ये असलेले मोठे, मध्यम आणि लघु असे एकूण ५०९ प्रकल्पात, मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ३५ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. तसेच पावसाळा काही दिवसांवर ठेपला आहे. यामुळे यंदाच्या वर्षी अमरावतील विभागात पाण्याची टंचाई होणार नाही. मागील वर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या प्रकल्पांमध्ये १४.१५ टक्के इतका साठा उपलब्ध होता.

अमरावती विभागातील सर्वात मोठे जलसाठा प्रकल्प असलेल्या अमरावतीच्या अप्पर वर्धा धरणात यावर्षी आजघडीला ५१.१८ इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. मागील वर्षी या धरणात, या काळात १६.४३ टक्के इतका साठा होता. मागील पाच वर्षांच्या तुलनेत यावर्षीचा हा जलसाठा सर्वाधिक आहे.

अमरावती विभागाच्या ५०९ प्रकल्पात ३५ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक...

२०१८ च्या तुलनेत मागील वर्षी चांगला पाऊस झाला. यामुळे विभागातील सर्वच प्रकल्प जवळपास भरले होते. त्यामुळे या वर्षी पाणी टंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागले नाही. अमरावती विभागातील एकूण पाच जिल्ह्यातील मोठे, मध्यम आणि लघु असे एकूण ५०९ पाणी प्रकल्प आहेत. यातील ९ मोठ्या प्रकल्पात सध्या ४२.९६ टक्के जलसाठा आहे.

हेही वाचा - मोर्शी-अमरावती महामार्गावर दुचाकीच्या अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

हेही वाचा - सर्व दुकाने उघडण्याची परवानगी द्या; व्यापारी संघटनेची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.