ETV Bharat / state

शेततळ्यात बुडून दोन बालकांचा मृत्यू; अमरावतीच्या अंजनगाव बारी येथील घटना - childs drowned in farm ponds amravati

अमरावतीच्या अंजनगाव बारी येथे शेततळ्यात बुडून दोन बालकांचा मृत्यू झाला.

childs drowned (symbolic photo)
शेततळ्यात बुडून दोन बालकांचा मृत्यू (प्रतिकात्मक)
author img

By

Published : Sep 27, 2020, 5:05 AM IST

अमरावती - स्मशानभूमीत असलेल्या शेततळ्यातील पाण्यात बुडून दोन बालकांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी अंजनगाव बारी येथे घडली. तन्मय मारोती भुरे (वय - 9 वर्ष) आणि आर्यन दिलीप टेटू (वय - 8 वर्ष, दोन्ही रा. अंजनगाव बारी) अशी मृतांची नावे आहेत.

तिसऱ्या वर्गात शिकणारे दोन्ही बालक हे पोहण्याच्या नादात स्मशानभुमीजवळील शेततळ्यात गेले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने ते त्यात बुडाले. दोन्ही मुले दुपारपर्यंत घरी परतले नसल्याचे पाहून कुटुंबीयांनी शोध घेतला असता शेततळ्यात दोघांचे मृतदेह आढळून आले.

घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंजाब वंजारी यांच्या नेत्तृत्वात पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी शेततळ्यात बुडालेल्या बालकांचा शोध घेऊन मृतदेह बाहेर काढले. यानंतर दोघांच्या मृतदेहाना जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आले. या घटनेमुळे अंजनगाव बारीत शोककळा पसरली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.