ETV Bharat / state

शाळा झाली सुरू! अमरावतीत अनेक ठिकाणी मात्र ग्रामपंचायतचा ग्रीन सिग्नल नाही

ग्रामीण भागात असणाऱ्या 748 पैकी 337 उच्च माध्यमिक शाळा सुरू करण्याची परवानगी शिक्षण विभागाने दिली आहे. ही परवानगी देताना ग्रामस्तरीय समितीचे गठन करून या समितीने अहवाल सादर केल्यावरच संबंधित ग्रामपंचायतने शाळा सुरू करण्यास मान्यता देणे गरजेचे आहे. त्यानुसार या शाळा सुरू होणार होत्या. 337 पैकी केवळ 182 शाळांना ग्रामपंचायतची परवानगी मिळाली आहे.

182 Schools Reopen For Classes 8 To 12 In Rural Areas Of Amrawati maharashtra
शाळा झाली सुरू! अमरावतीत अनेक ठिकाणी मात्र ग्रामपंचायतचा ग्रीन सिग्नल नाही
author img

By

Published : Jul 16, 2021, 12:26 AM IST

Updated : Jul 16, 2021, 8:09 PM IST

अमरावती - कोरोनाचा संसर्ग कमी झालेल्या ग्रामीण भागात इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत गुरूवारपासून ऑफलाइन शिक्षण सुरू करण्याचे आदेश असताना अमरावती जिल्ह्यात बोटावर मोजण्या इतक्याच शाळेत विद्यार्थी आलेत. नियमानुसार शाळा सुरू करण्यास गावातील परिस्थिती पाहून ग्रामपंचतचा ठराव असणे आवश्यक असताना शिक्षण विभागाकडून परवानगी मिळालेल्या अनेक शाळांना ग्रामपंचायतकडून ग्रीन सिग्नल मिळाला नसल्याने या शाळा ऑफलाइन सुरू होण्यासाठी आणखी काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे.

प्रतिक्रिया
337 शाळांना परवानगी

जिल्ह्यातील ग्रामीण भागात असणाऱ्या 748 पैकी 337 उच्च माध्यमिक शाळा सुरू करण्याची परवानगी शिक्षण विभागाने दिली आहे. ही परवानगी देताना ग्रामस्तरीय समितीचे गठन करून या समितीने अहवाल सादर केल्यावरच संबंधित ग्रामपंचायतने शाळा सुरू करण्यास मान्यता देणे गरजेचे आहे. त्यानुसार या शाळा सुरू होणार होत्या. 337 पैकी केवळ 182 शाळांना ग्रामपंचायतची परवानगी मिळाली आहे. यापैकी अमरावती तालुक्यात 9, तिवसा तालुक्यात 7, चांदूर रेल्वे तालुक्यात 7, चांदूर बाजारमध्ये 4, अंजनगव सुर्जी तालुक्यात 14,, अचलपू तालुक्यात 13, वरुड तालुक्यात 23, मोर्शीमध्ये 21, धामणगाव रेल्वे तालुक्यात 10, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात 7, भातकुली तालुक्यात 7, मेळघाटातील धारणी तालुक्यात 24 आणि चिखलदरा तालुक्यात 17 शाळा सुरू झाल्याची माहिती शिक्षणाधिकारी खान यांनी दिली.

वलगावच्या शाळेत 25 टक्के उपस्थिती

अमरावती शहरापासून केवळ 15 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वलगाव येथील एस. एल. उच्च माध्यमिक विद्यालयात गुरूवारी पहिल्या दिवशी 25 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक शिक्षक, विद्यार्थी हे मास्क लावून शाळेत आले. वर्गखोलीत एका बाकावर केवळ एक विद्यर्थ्यांस बसविण्यात आले. शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यर्थ्यासाठी सॅनिटरची व्यवस्था करण्यात आली.

हेही वाचा - राज्यातील 5 हजार 947 शाळांमध्ये वाजली घंटा

विद्यार्थी-शिक्षक सगळे आनंदी

दीड वर्षापासून शाळेच्या आवारात न दिसणारे विद्यार्थी आज शाळेत आल्याने आता आम्हाला प्रसन्न वाटत असल्याची भावना एस. एल. शाळेचे मुख्याध्यापक रुपेश मिलके यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना व्यक्त केली. वलगावमध्ये अनेक महिन्यांपासून कोरोना रुग्ण आढळला नाही. या भागात पालकवर्ग मजुरीकाम करणारे असल्याने आई-वडील कामावर गेले की मुलं घराबाहेर फिरायला मोकळी होती. आता मात्र शाळा सुरू झाल्याने मुलांचा कल पुन्हा अभ्यासाकडे वाढेल असेही रूपेश मिलके म्हणले.

शाळा व्यवस्थान समिती अध्यक्ष आरिफ काजी यांनीही शाळा सुरू होणे आता गरजेचे झाले असून कोरोनाची भीती नसल्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय हा योग असल्याचे सांगितले. अनिल कुळकर्णी आणि रुपाली कुलट या शिक्षकांनी ऑनलाइन शिक्षणापेक्षा ऑफलाइन शिक्षणच योग्य आहे. आता शाळेत विद्यार्थी यायला लागल्याने गत दीड वर्षांपासून हरवलेले चैतन्य परत आले असल्याचे म्हणले. मोबाईलमधली शाळा पुन्हा चार भिंतीत सुरू झाल्याचा आनंद पायल महिंगे या विद्यार्थ्यांनीने व्यक्त केला.

अनेक शाळा बंदच; शिक्षकांचाही पत्ता नाही

जिल्ह्यात ग्रामीण भागात एकूण 748 शाळा आहेत. यापैकी गुरूवारपासून 337 शाळा सुरू करण्याचे आदेश असले तरी ग्रामीण भागात शिक्षक जागेवर नाहीत. ही वास्तविकता आहे. अनेक शिक्षक हे अमरावती शहर किंवा तालुक्यातून ग्रामीण भागातील शाळेत शिकवतात, अशा शिक्षकांपैकी अगदी मोजके शिक्षक दीड वर्षात शाळेकडे भिरकले आहेत. शासन आदेशानुसार 50 टक्के शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य आहे. मात्र 50 टक्के शिक्षकही शाळेत उपस्थित नाहीत हे वास्तव आहे. काही शाळेत ऑनलाइन शिकविण्यासाठी शाळेत व्यवस्था केली असली तरी अनेक शिक्षकांनी घरी बसूनच ऑनलाइन शिकविले तर अनेकांनी अधूनमधून ऑनलाइन शिकविल्याचे, काही शिक्षकांनी माहिती देताना सांगितले. नियमित शाळा सुरू असतानाही शाळेला दांडी मारणारे आमचे काही सहकारी कोरोना काळात तर शाळेला पार विसरले, असेही काही शिक्षकांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

हेही वाचा - झाडू मारणारी सफाई कर्मचारी झाली प्रशासकीय अधिकारी; ही जिद्द पहाच!

Last Updated : Jul 16, 2021, 8:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.