यवतमाळ - जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील दिग्रस रोडवरील घाटोडी चेकपोस्ट जवळ एका वाहनातून 18 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या फिरत्या पथकाने ही कारवाई केली आहे.
हे ही वाचा - सात मतदारसंघांसाठी 2499 मतदान केंद्र; 21 लाख 72 हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क
यवतमाळ जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघ आहेत. जिल्ह्यात निवडणूक विभागामार्फत चेक पोस्ट तयार करून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. पुसद तालुक्यातील दिग्रस रोडवरील घाटोडी चेकपोस्टजवळ बुधवारी स्विफ्ट डिझायर या वाहनाची तपासणी केली. त्यामधून 18 लाख 59 हजार 856 रुपयांची रक्कम आढळून आली. हे वाहन अमरावती येथील व्यापारी बिहारी लाल वर्मा यांचे असून ते पुसदकडे येत होते. त्या दरम्यान ही कारवाई सर्व्हेक्षण पथक प्रमुख राठोड यांच्या पथकाने केली. या रोकड संदर्भात योग्य खुलासा न केल्याने ही रोकड जप्त केली आहे. या संदर्भात पुढील कारवाई निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड करीत आहेत.