अमरावती - प्रगतशील व प्रयोगशील शेती करणाऱ्या 17 शेतकऱ्यांना राजीव गांधी कृषीरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानच्यावतीने अभियंता भवन येथे आयोजित सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानच्यावतीने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी 21 मे ला आदर्श शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात येतो. आज माजी मंत्री वसुधा देशमुख यांच्या अध्यक्षतेत आयोजित या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार रावसाहेब शेखावत, पौर्णिमा सवाई, किशोर चांगोले, प्रदीप जगताप, शशिकांत बोंडे, उमेश वाकोडे, जावेद खान, वासुदेव जोशी, हेमंत डिके,मिलिंद फडके, अभिजित बोके आणि राजीव गांधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश साबळे प्रामुख्याने उपस्थित होते.
या सोहळ्यात उत्कृष्ट कृषी तज्ञ म्हणून प्रशांत महल्ले, उत्कृष्ट महिला शेतकरी म्हणून बुलडाणा जिल्ह्यातील निकिता विजय पातळे, उत्कृष्ट कृषी उद्योजिका म्हणून जयश्री गुंबळे, कृषी विषयावर लिखाण करणारे गोपाल हरणे आणि हेमंत निखडे यांचाही 17 शेतकऱ्यांसोबत पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.