अमरावती: माजी नगरसेवक शेख जफर यांच्यावर आयुक्तालय हद्दीत बरेच गुन्हे दाखल आहेत. त्यांची गुन्ह्याची पार्श्वभूमी पाहता कोतवालीच्या ठाणेदार नीलिमा आरज यांनी शेख जफरच्या तडीपारीचा प्रस्ताव पाठवला होता.
शेख जफरला शहरातून तडीपार करण्याचा निर्णय: शेख जफरवर (sheikh zafar) आयुक्तलायसह अन्य जिल्ह्यात सुध्दा गुन्हे दाखल आहेत. ठाणेनिहाय दाखल गुन्ह्यांची संख्या कोतवाली 9, नागपुरीगेट 4, पांढरकवडा 1, हिंगोली 1 आणि फ्रेजरपुरा ठाण्यात 1 असे 16 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल (16 serious crimes filed) असल्यामुळे वरीष्ठांनी शेख जफरला शहरातून तडीपार करण्याचा निर्णय घेतला. सोमवारी दुपारी वरीष्ठांनी शेख जफरची तडीपारीचा आदेश काढला. त्या आदेशान्वये कोतवाली पोलिसांनी (Kotwali Police) दुपारी शेख जफर यांना अटक करून मुर्तीजापुरला नातेवाईकांच्या घरी सोडले.