अमरावती - अचलपूर जवळ असणार्या वझर येथील अनाथ आश्रमातील १२३ निराधार अनाथ मुलांसह शंकरबाबा पापडकर यांनी आज मतदानाचा हक्क बजावला.
शंकरबाबा पापडकर यांनी आज वझर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये आपल्या १२३ अनाथ मुलांसह मतदान केले. वझर येथील अनाथ आश्रमात मूकबधीर तसेच अनाथ असणाऱ्या मुलांना घेऊन शंकरबाबा पापळकर आज सकाळी १०:३० वाजता आश्रमशाळेपासून 2 किलोमीटरपर्यंत पायी जात त्यांनी जवळ असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा वझर येथे मतदानाचा हक्क बजावला. तर यावेळी मागील वर्षी अमरावती येथे विवाहबद्ध झालेल्या त्यांची कन्या व त्यांच्या मुलांचाही समावेश आहे.