अमरावती - जिल्ह्यात गुरुवारी 12 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. बडनेरा परिसरात कोरोनाने कहर केला असताना आता जिल्ह्यातील मोर्शी आणि नांदगाव खंडेश्वर या भागातही कोरोना रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. तर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 472 वर पोहोचली आहे.
गुरुवारी आढळलेल्या 12 नवीन बाधितांमध्ये 5 रुग्ण बडनेरा परिसरातील आहेत. यामध्ये नवी वस्ती बडनेरा परिसरात 29 वर्षीय महिला, बडनेरा जुनी वस्ती परिसरातील नूर नगर भागात राहणारी 32 वर्षीय महिला, बडनेराच्या जुनी वस्ती भागात येणाऱ्या पटेल नगर परिसरात 42 वर्षांच्या दोन महिला, 36 वर्षाच्या महिला आणि एक 12 वर्षाची युवतीचा समावेश आहे.
आणखी गुरूवारी आढळलेले कोरोनाबाधित -
- अमरावती शहरातील जनता कॉलनी परिसरातील 42 वर्षीय पुरुष
- कॅम्प परिसरातील वृंदावन कॉलनीतील 31 वर्षीय पुरुष
- संतोषी नगर परिसरातील रहिवासी असणाऱ्या 40 वर्षीय पुरुष
- मोर्शी तालुक्यातील विचोरी गावातील 45 वर्षीय महिला
- नांदगाव खंडेश्वर येथे 28 वर्षीय युवक
- साबण पुरा परिसरात राहणारी 52 वर्षीय व्यक्तीलाही कोरोना झाल्याचा अहवाल नागपूर येथील खासगी प्रयोगशाळेतून प्राप्त झाला आहे.
अमरावती जिल्ह्यात 3 एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 472 वर पोहोचली आहे. सद्याची परिस्थिती बघता येत्या काही दिवसात जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ही पाचशेचा आकडा गाठणार आहे.